हैदराबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ही भ्रुणाच्या मेंदूची 3D उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा प्रकाशित करणारी जगातील पहिली संशोधन संस्था बनली आहे. याबात संचालक व्ही कामकोटी यांनी मंगळवारी सांगितलं की अशा उच्च-रिझोल्यूशन मेंदूच्या प्रतिमा तयार करण्याचं मुख्य अनुप्रयोग आजाराचे लवकर निदान करण्यात मदत करतील. न्यूरो सायन्स क्षेत्रासाठी हे काम मोठं यश असल्याचे ते म्हणाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास, भ्रुणाच्या मेंदूची सर्वात तपशीलवार 3D उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा प्रकाशित करणारी जगातील पहिली संशोधन संस्था बनली आहे.
For the first time, the Sudha Gopalakrishnan Brain Centre at @iitmadras has released detailed 3D high-resolution images of the human fetal brain—DHARANI, featuring 5,132 brain sections at cell resolution. Remarkably, it was done at less than 1/10th the cost of similar Western… pic.twitter.com/TPkcNjUmjm
— IIT Madras (@iitmadras) December 10, 2024
मेंदूच्या डिजिटल प्रतिमा : मेंदूच्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा निर्माण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भ्रुणाच्या विकासाच्या अवस्थेत रोगांचा लवकर शोध घेणे आणि त्यावर उपचार करणे आहे. IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी मंगळवारी सांगितलं, "जगात प्रथमच, IIT मद्रासच्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरनं विकसित केलेल्या अत्याधुनिक ब्रेन मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून 5,132 मेंदूच्या व्हॉल्यूमच्या डिजिटल प्रतिमा घेण्यात आल्या. न्यूरोसायन्सच्या क्षेत्रासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.भारतात अशा प्रकारचा प्रगत मानवी न्यूरोसायन्स डेटा तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत हा प्रकल्प 1/10 व्या पेक्षा कमी खर्चात पूर्ण झालाय.
मेंदूचा सर्वात मोठा डिजिटल डेटा : भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रोमानिया आणि दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांसह आयआयटी मद्रासच्या टीमनं हे संशोधन केलं. चेन्नईस्थित मेडिस्कॅन सिस्टम्स आणि सविता मेडिकल कॉलेज हॉस्पिटलनं यासाठी सहकार्य केलं. संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ कॉम्पॅरेटिव्ह न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. हा डेटा जगभरातील सर्व संशोधकांसाठी मोफत उपलब्ध आहे. जर्नल ऑफ कॉम्पॅरेटिव्ह न्यूरोलॉजीच्या मुख्य संपादक सुझाना हर्कुलॅनो-हौझेल म्हणाल्या, हा मानवी भ्रुणाच्या मेंदूचा सर्वात मोठा डिजिटल डेटा आहे.'
हे वाचलंत का :