हैदबाद : टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागल्या प्रकरणी हैदराबादमधील ग्राहक न्यायालयानं टाटा मोटर्सला मोठा दणका दिला आहे. न्यायालयानं कंपनीला नेक्सॉन ईव्ही कारच्या मालकाला कारची संपूर्ण किंमत परत करण्याचे आदेश दिले आहेत. कार मालकाचं नाव जोनाथन ब्रेनर्ड आहे. आपल्या कारला आग लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. कारला आग मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टमुळं लागल्याचं कोर्टानं मान्य केलंय. यासोबतच जिल्हा ग्राहक निवारण आयोगानंही ब्रेनर्डला झालेल्या मानसिक तणावाची भरपाई देण्याचे आदेश दिलेय.
काय आहे संपूर्ण प्रकरण? : ही घटना जून 2023 मध्ये घडली होती. त्यावेळी ब्रेनार्ड यांच्या मालिकीच्या टाटा नेक्सॉन ईव्ही कारला अचानक आग लागली होती. ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे. त्यावेळी ब्रेनर्ड गाडी चालवत होते. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा ब्रेनर्डनं यांनी सांगितलं होतं की त्यांची कार ३८ किमी/ प्रतितास वेगानं धावत होती. त्यानंतर अचानक मोठा स्फोट होऊन कारनं पेट घेतला. त्यांनी तात्काळ गाडीतून उतरून आपला जीव वाचवला. आग वेगानं पसरल्यामुळं कारचं दरवाजे जाम झाले होते. त्यावेळी ते ड्रायव्हरच्या बाजूच्या दारातूनच बाहेर पडले होते. या घटनेनंतर ब्रेनर्ड यांनी टाटा मोटर्सविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. कारमध्ये आधीच अनेक तांत्रिक समस्या असल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं.
बॅटरी लवकर डिस्चार्ज : ब्रेनर्ड यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कारची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत होती. त्याच वेळी कार 18% चार्ज केल्यानंतर ती चालू शकत नव्हती. त्यांनी कार सर्व्हिस सेंटरला दाखवली असता त्यांना प्रथम कारची एचव्ही बॅटरी खराब असल्याचं सांगण्यात आलं. मग त्यांच्या नकळत नवीन बॅटरी बसवण्याऐवजी जुनी रिफर्बिश्ड बॅटरी बसवली कारमध्ये बसवली होती, असा कार मालकाचा आरोप आहे.
16.95 लाख रुपये परत करण्याचे आदेश : या प्रकरणाची सुनावणी करताना, हैदराबादच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगानं टाटा मोटर्सला कारची संपूर्ण किंमत म्हणजेच 16.95 लाख रुपये कार मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर मानसिक छळ आणि दुखापतींसाठी अडीच लाख रुपये, खटल्याच्या खर्चापोटी 10 हजार रुपये भरपाईचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
हे वाचलंत का :