ETV Bharat / technology

PM Kisan AI Chatbot माध्यामातून मिळवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे - HOW TO USE PM KISAN AI CHATBOT

PM Kisan AI Chatbot : PM Kisan योजनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांची आता तुम्ही झटपट उत्तरे मिळवू शकता. यासाठी तुम्ही AI Chatbot वापर करु शकता.

PM Kisan AI Chatbot
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 13, 2024, 6:00 PM IST

हैदराबाद PM Kisan AI Chatbot : पीएम किसान एआय चॅटबॉट शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींचे निराकरण करण्यात मदत करते. त्याला किसान ई-मित्र असंही म्हणतात. हा चॅटबॉट इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि तमिळ अशा 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ भाषेत माहिती पुरवतो, त्यामुळं शेतकऱ्यांना सहज माहिती मिळते.

किसान सन्मान निधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारतर्फे दिली जाते. या योजनेचा 18 वा हप्त्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही ते पीएम किसान एआय चॅटबॉट वापरून त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

एआय चॅटबॉटचा वापर : पीएम किसान एआय चॅटबॉटचा वापर करण अगदी सोपं आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घ्याची आहे, त्यांनी खाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्यात.

पीएम किसान मोबाइल ॲप : तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला आगोदर पीएम किसान मोबाइल ॲप डाउनलोड करावं लागेल. हे ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. एकदा ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्याचा वापर करू शकता.

AI चॅटबॉट कसा वापरायचा :

  • तुमच्या मोबाईलच्या Play Store वर जाऊन KISAN AI डाउनलोड करा.
  • ॲप उघडा आणि AI ChatBOT वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा प्रश्न विचारा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही www.pmkisan.gov.in या वेबसाइटलाही भेट देऊ शकता. पीएम किसान योजनेशी संबंधित तुमच्या प्रश्नांना वेळेवर आणि अचूक प्रतिसाद देण्यासाठी AI चॅटबॉटची रचना करण्यात आली आहे. तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता.

  • अर्जाची स्थिती : तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती तपासा
  • पेमेंट तपशील : पेमेंट शेड्यूल आणि रकमेबद्दल माहिती मिळवा
  • अपात्रता स्थिती : तुमचा अर्ज का नाकारला गेला असेल ते समजून घ्या
  • योजना संबंधित अद्यावयत माहिती : पीएम किसान योजनेतील बदल किंवा अद्यतनांबद्दल माहिती मिळवा.

भाषा समर्थन : चॅटबॉट सध्या इंग्रजी, हिंदी, बांगला, ओडिया आणि तमिळ या पाच भाषांना सपोर्ट करतं. चॅटबॉट लवकरच भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व 22 भाषांमध्ये उपलब्ध होईल.

चॅटबॉटचे फायदे : पीएम किसान एआय चॅटबॉटचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना प्रदान करून सक्षम करणे आहे. पीएम किसान मोबाइल ॲप इतर वैशिष्ट्ये देखील ऑफर करते, जसे की: फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी, ई-केवायसी पूर्ण करून इतर शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता.

तंत्रज्ञानाचा वापर करून, सरकारचे उद्दिष्ट पीएम किसान योजना सुव्यवस्थित करणे आणि अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवणे आहे. AI चॅटबॉट हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हे वाचलंत का :

  1. PM KISAN 18 वा हप्ता जमा : थेट 'या' लिंकवरून तपासा तुमच्या खात्यातील पैसे - pm kisan 18th installment
  2. PM किसानच्या 18 व्या हप्त्यासाठी तत्काळ करा ई केवायसी, कसं करायचं E KYC? - PM Kisan Samman Nidhi
  3. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता खात्यावर जमा - PM Kisan Samman Nidhi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.