धारवाड (कर्नाटक) Gaganyaan Mission 2025 : 'ड्रॉसोफिला मेलानोगास्टर' असं वैज्ञानिक नाव असलेल्या माशा कर्नाटकातील धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या (यूएएस) जैवतंत्रज्ञान विभागानं विकसित केल्या आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की अंतराळातील अंतराळवीरांमध्ये मूत्रपिंड (दगडांची निर्मिती) समजून घेण्यात या माशा महत्त्वपूर्ण ठरतील. अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांमध्ये 30 पेक्षा जास्त वेळा किडनी स्टोन झाल्याचं आढळून आलं आहे. 'ड्रॉसोफिला मेलानोगास्टर' या वैज्ञानिक नावाच्या या माशा पुढील वर्षी होणाऱ्या इस्रोच्या बहुप्रतिक्षित 'गगनयान' मोहिमेच्या प्रयोगात वापरल्या जातील.
किडनी स्टोनची प्रक्रिया समजणार : धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या (UAS) जैवतंत्रज्ञान विभागातील सदस्यांनी या माशा विकसित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनयान यानवर 15 फ्रूट फ्लायचे किट बसवण्यात येणार आहे. जे सात दिवस अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणात प्रदक्षिणा घालणार आहे. अंतराळात मानवांमध्ये किडनी स्टोन तयार होतात, तेव्हा आण्विक यंत्रणा कशी कार्य करते, हे समजून घेण्यासाठी फ्रूट फ्लाय महत्त्वपूर्ण भूमीका निभावणार आहे. याचं कारण म्हणजे अंतराळवीरांमध्ये किडनी स्टोन ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे.
नाविन्यपूर्ण उपचारासीठी उपयुक्त : यूएएस बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक रवी कुमार होसमनी म्हणाले, "विशेषत: भारतीय अंतराळवीरांसाठी नाविन्यपूर्ण उपचार शोधण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरेल." अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या किटमध्ये ऑक्सिजन भरला जाईल. त्यामध्ये रवा तसंच गूळ मिसळून अन्न तयार केलं जाईल. "आम्ही या माशांना सोडियम ऑक्सलेट (NaOx), इथिलीन ग्लायकोल (EG), आणि हायड्रॉक्सी एल प्रोलाइन (HLP) खाण्यासाठी देणार आहोत. त्यानंतर त्या माशा 3-4 दिवसात किडनी स्टोन विकसित करतील,"
या प्रयोगाची गरज : युएएसच्या शास्त्रज्ञांनी अंतराळविराच्या अभ्यासाच्या क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी इस्रोशी हातमिळवणी केली आहे. 'आम्ही 2025 मध्ये मानवांना अंतराळात पाठवू शकतो. त्यामुळं, आम्ही मिशनच्या अगोदर तयारी केली पाहिजे. अनेक अहवालांमध्ये असं दिसून आलं, की अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांमध्ये 30 पेक्षा जास्त वेळा किडनी स्टोन आढळलं आहेत. त्यामुळं या प्रयोगाची गरज आहे. जर आपण किडनी स्टोनच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास आणि निरीक्षण करू शकलो, तर आपण आपल्या अंतराळवीरांना वाचवू शकू आणि त्यांना निरोगी ठेवू शकू," असं यूएएसचे कुलपती डॉ. पी. एल. पाटील म्हणाले.
पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचं अनावरण : 2025 मध्ये गगनयान कार्यक्रमातर्गंत उद्दिष्ट तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी रोजी केरळच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचं अनावरण केलं होतं. या मोहिमेत कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे.
हे वाचलंत का :