ETV Bharat / technology

जंगलातील आगीमुळं कार्बन उत्सर्जनात 60 टक्के वाढ, हवेची गुणवत्ता खालवली - CARBON INCREASE EMISSIONS DUE FIRES

जंगलाला लागलेल्या आगीमुळं कार्बन उत्सर्जनात 60 टक्के वाढ झाल्याचं एका आभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळं हवेची गुणवत्ता देखील खालवत असल्याचं दिसून आलं.

Forest fires
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 22, 2024, 10:18 AM IST

हैदराबाद : गेल्या दोन ते अडीच दशकांमध्ये जंगलातील आगीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय वाढ झाली झाल्याचं एका आभ्यासातून दिसून आलं आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर जंगलातील आगीमुळं कार्बन उत्सर्जन 60 टक्क्यांनी वाढलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाच्या नेतृत्वात हा अभ्यास शुक्रवारी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर जंगलातील आग आणि जंगलाबाहेरील लागलेल्या आगींमध्ये फरक करणारा हा पहिला अभ्यास असल्याचा दावा करण्यात आला आहे.

उत्सर्जन जवळपास तिप्पट : 2001 ते 2023 दरम्यान युरेशिया आणि उत्तर अमेरिकेतील बोरियल जंगलांमध्ये वणव्यातून उत्सर्जन जवळपास तिप्पट झालं, असं अभ्यासातून दिसून आलं. गेल्या दोन दशकांत जंगलातील आगींच्या संख्येसह तिची तीव्रताही वाढली आहे. हा अभ्यास इंग्लंड, यूएसए, नेदरलँड, ब्राझील आणि स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघानं केला आहे.

हवेची गुणवत्ता खराब : जीवाश्म इंधन उत्सर्जनासारखी हवामान बदलाची प्राथमिक कारणे टाळली गेली, तरच जंगलातील आगीचा प्रसार रोखता येईल, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. अलीकडील जंगलातील आगीनंतर जंगलं अधिक तीव्रतेनं जळत आहेत. त्यामुळं वातावरणात अधिक घातक धूर पसरतोय. आग लागलेल्या क्षेत्राजवळ धुरामुळं खराब हवेच्या गुणवत्तेच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना जास्त धोका असतो, असं त्यात म्हटलं आहे.

ग्लोबल वार्मिंग : जंगलातील आगीच्या वाढत्या धोक्यापासून वन परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी जागतिक तापमानवाढ रोखणं आवश्यक आहे. शून्य उत्सर्जनाकडं जलद लक्ष देण्याची गरज असल्यावर हा अभ्यास अधोरेखित, असं टिंडल सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्चचे प्रमुख लेखक डॉ. मॅथ्यू जोन्स यांनी म्हटलं आहे.

तापमाणात लक्षणीय वाढ : आगिच्या उत्सर्जनाचा केंद्रबिंदू उष्णकटिबंधीय जंगलांमधून आणि अतिउष्णकटिबंधीय प्रदेशांच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळं उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये तापमाणात लक्षणीय वाढ व्यापकपणे दिसून आली. वाढलेलं उत्सर्जन आग अनुकूल हवामानातील वाढीशी जोडलेलं आहे. यात उष्णतेच्या लाटा दुष्काळादरम्यान दिसणारी उष्ण कोरडी परिस्थिती तापमानवाढीला मदत करते. जी जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगानं होत आहे. गेल्या दोन दशकांत जंगलातील आगींच्या प्रमाणातच नव्हे तर त्यांची तीव्रताही चिंताजनक असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. कार्बन ज्वलन दर, जळलेल्या क्षेत्राच्या प्रति युनिट किती कार्बन उत्सर्जित होतो, यावर आधारित आगीच्या तीव्रतेचं मोजमाप, 2001 ते 2023 दरम्यान जगभरातील जंगलांमध्ये जवळपास 60% ने वाढलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.