हैदराबाद Electric bike sales growth in 2024 : गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) देशात इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री प्रचंड वाढली आहे. सणासुदीच्या काळात मिळालेल्या ऑफर आणि सवलतींचा लाभ आजूनही सुरूच आहे. भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी सातत्यानं वाढत आहे. यावर्षी 1 जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत विक्री 10 लाखांच्या पुढं गेली आहे. आता तुम्ही अंदाज लावू शकता की देशातील लोक पेट्रोलपेक्षा इलेक्ट्रिक दुचाकीला जास्त पसंत करताय.
36% विक्रीत वाढ : एका अहवालानुसार 1 जानेवारीपासून 10,00,987 युनिट्सची विक्री झाली आहे. 2023 च्या तुलनेत यावर्षी 36% विक्रीत वाढ झाली आहे. विक्रीचा हा ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा आहे. वर्षाच्या अखेरीस, हा रेकॉर्ड 1.1 ते 1.2 दशलक्ष युनिट्स पोहचू शकतो. त्याच वेळी, हा आकडा 2021 च्या तुलनेत 540 टक्के अधिक आहे. 2021 मध्ये केवळ 1,56,325 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली होती.
कोणत्या बॅंडची झाली विक्री : अहवालानुसार, OLA इलेक्ट्रिक, TVS, BAJAJ आणि Ather Energy च्या स्कूटरच्या विक्रीत वाढ झालीय. ओला इलेक्ट्रिकनं या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 3,76,550 युनिट्सची विक्री केली आहे. ओला इलेक्ट्रिकनं सर्वाधिक वाहनं विकून पहिल्या क्रमांकावर पटकवला आहे. ओला इलेक्ट्रिकचा बाजारातील हिस्सा 37% आहे. त्याच वेळी, TVS नं 1,87,301 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, त्यांचा बाजार हिस्सा 19% आहे. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान निर्माण केलं आहे.
बजाज ऑटो तिसऱ्या क्रमांकावर : याशिवाय बजाज ऑटोनं 1,57,528 युनिट्सची विक्री केली आहे, तर 16% मार्केट शेअरसह ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. विक्रीच्या बाबतीत एथर एनर्जी चौथ्या क्रमांकावर आहे. कंपनीनं 1,07,350 युनिट्सची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकार आणि वाहन कंपन्यांचं उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत आहे. येत्या काही वर्षांत हा इलेक्ट्रिक वाहनाची संख्या झपाट्यानं वाढू शकते. पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये अनेक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाइक्स लाँच होणार आहेत. त्यामुळं बाजारात ईव्हीची विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का :