हैदराबाद ABHED Bullet Proof Jackets : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसह (DRDO) IIT दिल्लीच्या संशोधकांच्या सहकार्यानं 'ABHED' नावाचं हलकं बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलं आहे. हे जॅकेट पॉलिमर आणि देशी बोरॉन कार्बाइड सिरॅमिक मटेरियलपासून बनवलं आहे. या जॅकेटची रचना कोणत्याही प्रकारचा उच्च वेगाचा दाब सहन करू शकते. जॅकेटसाठी आर्मर प्लेटनं प्रोटोकॉलनुसार सर्व आवश्यक संशोधन आणि विकास चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. हे जाकेट बहुतेक धोके सहन करण्यास सक्षम आहे.
हलकं वजन असलेलं बुलेट प्रूफ जॅकेट हे डीआरडीओ, शिक्षण आणि उद्योग यांच्या संरक्षण संशोधन विकासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. - डॉ. समीर व्ही. कामत, अध्यक्ष डीआरडीओ
360 डिग्री तापमाणाचं संरक्षण करणार : भारतीय सैन्याच्या आवश्यकतेनुसार कमाल वजन मर्यादेपेक्षा ते हलकं आहे. विविध BIS स्तरांसाठी किमान संभाव्य वजन 8.2 किलो तसंच 9.5 किलोग्रॅमसह, हे मॉड्यूलर-डिझाइन केलेलं जॅकेट फ्रंट आणि बॅक आर्मरसह 360 डिग्री तापमाणाचं संरक्षण करेल. त्याची निर्मिती लवकरच होणार आहे. त्यासाठी काही उद्योगांची निवड करण्यात आली आहे.
डीआयए-सीओईची उभारणी : संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांना सहभागी करून घेण्यासाठी वर्ष 2022 मध्ये आयआयटी दिल्ली या संस्थेत असलेल्या डीआरडीओच्या संयुक्त प्रगत तंत्रज्ञान केंद्रात बदल घडवून आणून डीआयए-सीओईची उभारणी करण्यात आली होती. हे केंद्र आता डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्पांवर काम करत आहे.
हे वाचलंत का :