नवी दिल्ली IndiaAI innovation challenge : IndiaAI इंडिपेंडेंट बिझनेस डिव्हिजन (IBD), इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनं शुक्रवारी इंडियाएआय इनोव्हेशन चॅलेंजची घोषणा केली. या इनोव्हेशन चॅलेंजमध्ये भारतीय इनोव्हेटर्स, स्टार्टअप्स, नॉन-प्रॉफिट, विद्यार्थी, शैक्षणिक किंवा संशोधन आणि विकास संस्था आणि कंपन्या सहभागी होऊ शकतात. “मोठ्या प्रमाणावर सामाजिक-आर्थिक परिवर्तन सक्षम करण्यासाठी प्रभावी AI उपायांचा अवलंब करणे असं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे,”. यातील "विजेत्यांना 1 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आणि राष्ट्रीय स्तरावर काम लागू करण्याची संधी मिळणार आहे. रोग्यसेवेमध्ये, या आव्हानासाठी निदान आणि रुग्णांची काळजी घेणे, क्ष किरनांचा वापर करून रोगाचं निदान करणे आवश्यक आहे.
तक्रार निवारणासाठी AI चा वापर : तक्रार निवारणासाठी AI-सक्षम भाषा तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात. कृषी क्षेत्रात, अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी एआय-सहाय्यित पीक सल्ला, आर्थिक समावेश आणि भूस्थानिक विश्लेषणाचा वापर यासारख्या सेवांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम केलं जाऊ शकतं. या आव्हानामध्ये शिकण्याच्या अक्षमतेसाठी सहाय्यक तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. जे प्रगत मल्टीमीडिया साधने आणि गेमिफाइड लर्निंगसह विशिष्ट शिकण्याच्या अक्षमतेसाठी समर्थन सक्षम करू शकता.
AI ऍप्लिकेशन्सचा विकास : आपत्ती पूर्व चेतावणी प्रणाली, सुरक्षा मॅपिंगसह हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी नवकल्पना विकसित करू शकतात. हे आव्हान देखील IndiaAI मिशन अंतर्गत ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट उपक्रमाचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश गंभीर क्षेत्रांमध्ये AI ऍप्लिकेशन्सचा विकास, अवलंब करणे आहे. IndiaAI ही IndiaAI मिशनची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे, ज्याचे उद्दिष्ट समाजाच्या सर्व वर्गांमध्ये AI चे फायदे लोकशाहीकरण करणे, AI मधील देशाचे जागतिक नेतृत्व मजबूत करणे, तांत्रिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि AI चा नैतिक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करणे आहे.
हे वाचलंत का :