ETV Bharat / technology

'या' ट्रिक्स वापरून करा रेल्वेचं तिकीट बुक, वाचणार बक्कळ पैसे - How to Save Money on Train Tickets - HOW TO SAVE MONEY ON TRAIN TICKETS

Save Money on Train Tickets : दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेचा वापर करतात. सध्या,लांबचा प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वात किफायतशीर साधन आहे. मात्र, याव्यतिरिक्त अशा काही ट्रिक्स आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही पैशाची बचत करू शकता? चला तर मग जाणून घेऊया अशाच काही ट्रिक्स...

Indian Railways
भारतीय रेल्वे ((फोटो - Getty Images))
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 31, 2024, 5:33 PM IST

Updated : Aug 31, 2024, 10:33 PM IST

हैदराबाद Save Money on Train Tickets : सध्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात स्वस्त साधन आहे. देशातील करोडो लोकांना रेल्वेचा प्रवास आवडतो. त्यामुळं देशभरातील लाखो लोक दररोज तिचा वापर करतात. सणाच्या हंगामात लोक सुट्ट्यांवर जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यासाठी त्यांना आगाऊ तिकीट बुक करावं लागतं. त्यामुळं तुम्ही कोणत्या श्रेणीच्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहात त्यानुसार, तुमच्या तिकिटाची किंमत निश्चित केली जाते. ती कमी-अधिक असू शकते. सवलती, कूपनचा वापर करून तिकीट बुक केल्यास काही पैसे वाचू शकतात. त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

1. आगाऊ तिकिट बुक करा : जर तुमचा प्रवास आधीच ठरलेला असेल, तर तुम्ही आगाऊ तिकीट बुक करा. प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटच्या क्षणी बुकिंग केल्यास तिकीट मिळेलच याची श्वासवती नसते. शेवटच्या क्षणी बुकिंग केल्यानं कन्फर्म तिकीट मिळण्याची अनिश्चितता वाढते. तुम्ही 'तत्काळ बुकिंग' देखील टाळावं, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागेल.

2. तुमचं बुकिंग विभाजित करा : जर अनेक लोक एकत्र प्रवास करत असतील, तर तिकिटांचं विभाजन करायला हवं. तुम्ही लांबच्या प्रवासासाठी एकच तिकीट बुक करू शकता किंवा प्रवासाची विभागणी करून अनेक तिकीट बुक करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रायपूर ते पाटणा प्रवास करायचा असेल तर, तुम्ही तुमचा प्रवास दोन टप्प्यात विभागू शकता. ही युक्ती विशेषतः सणासुदीच्या काळात उपयोगी पडते.

3. कॅशबॅक ऑफरवर लक्ष ठेवा : तुमची तिकिटं बुक करताना तुम्ही नेहमी कॅशबॅक ऑफरवर लक्ष ठेवावं. शेवटच्या क्षणी बुकिंगवर भरपूर पैसे खर्च करण्याऐवजी आगोदरच बुकिंग करावं. अनेक वेबसाइट्स रेल्वे तिकीट बुकिंगवर कॅशबॅक, तसंच सूट देतात.

4. IRCTC पेमेंट कार्ड वापरा : IRCTC नं SBI च्या सहकार्यानं तिकीट बुकिंगसाठी प्लॅटिनम कार्ड लाँच केलं आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्याऐवजी, तुम्ही IRCTC SBI कार्ड वापरू शकता. हे AC1, AC2 आणि AC3 कोच बुकिंगसाठी व्हॅल्यू बॅक रिवॉर्ड्स देतं. हे पेमेंट कार्ड झटपट बुकिंगसाठी चांगलं काम करतं.

5. स्लीपर कोचमध्ये प्रवास : स्लीपर कोचमध्ये प्रवास केल्यानं तुम्हाला एसी कोचमधील तिकिटांच्या बुकिंगच्या तुलनेत तुमची अर्धी रक्कम वाचविण्यात मदत होईल. जर हवामान चांगलं आणि अनुकूल असेल तर तुम्ही एसी कोचमध्ये प्रवास करण्याऐवजी स्लीपर क्लास निवडू शकता. यामुळं पैशांची खूप बचत होते.

6. कूपन कोड मिळवा : ट्रॅव्हल आणि टुरिझम साइट्स किंवा ॲप्सद्वारे तिकीट बुक केल्यानं कूपन आणि सवलत मिळतात. ऑफर केलेल्या कूपनवर नेहमी लक्ष ठेवा आणि त्यांचा लाभ घेण्यास विसरू नका. कूपन कोड असल्यामुळं तुम्हाला कमी किमतीत तिकिटं बुक करण्यात मदत होईल.

7. मध्यम-स्पीड ट्रेन निवडा : गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी कमी वेळ घेणाऱ्या गाड्या निवडणं अनेक स्थानकांवर थांबणाऱ्या ट्रेनपेक्षा जास्त महाग असू शकतं. तुम्हाला त्याची गरज नसल्यास, तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी सरासरी वेग असलेली ट्रेन निवडा. या गाड्या अनेक स्थानकांवर थांबतात. जिथे पोहोचायला जास्त वेळ लागतो. अशा गाड्यांचे तिकीट दर सहज परवडणारे असतात.

Last Updated : Aug 31, 2024, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.