ETV Bharat / technology

महिलांनो आता बिनधास्त जगा, 'हे' ॲप करणार तुमची सुरक्षा - Women Safety APP

Women Safety APP : पश्चिम बंगालमधील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारासह हत्येच्या घटनेमुळं महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सरकारनं सुरक्षेविषयी पावलं उचलण्यास सुरवात केलीय. त्यासाठी पश्चिम बंगाल सरकार 'रात्रीरेर साथी' नावाचं ॲप लॉंच करणार आहे.

Women Safety APP
महिला सुरक्षा ॲप (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 29, 2024, 7:36 PM IST

हैदराबाद Women Safety APP : आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारासह हत्येनं देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं सरकारी रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इतकंच नव्हे तर शहरातील रस्ते महिलांसाठी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगाल सरकारनं ॲप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं 'रात्रीरेर साथी' नावाच्या ॲपची जाहीर घोषणा केलीय. हे ॲप लवकरच सुरू होणार आहे.

रातीरेर साथी : पश्चिम बंगाल सरकारद्वारे 'रात्रीरेर साथी' नावाचं ॲप विकसित करण्यात येणार आहे. महिला त्यांच्या मोबाइल फोनवर डाउनलोड करून या ॲपचा वापर करू शकतात. या ॲपमध्ये अलार्म Syaytem असेल. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यास महिला थेट पोलिसांशी ॲपच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. या ॲपमधील विशेष अलार्म पोलिसांना देखील कळणार आहे. तसंच पोलीस जीपीएस लोकेशन पाहून पीडितेला तत्काळ मदत करू शकतात.

https://play.google.com/store/apps/detailsid=com.web.bhoroxaa&pcampaignid=web_share

कावल उठावी : हे ॲप 2022 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लॉन्च केलं होतं. तामिळनाडू पोलीस या ॲपच्या मदतीनं सुरक्षा पुरवतंय. यात 60 हून अधिक फिचर देण्यात आले आहेत. हे ॲप ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही सुरक्षा प्रदान करतं. या ॲपमधील फीचर पोलिसांना धोक्याचं संकेत देतं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिक थेट मोबाइलवरून 112,100, 101 डायल करून पोलिसांची मदत घेऊ शकता. इमर्जन्सी बटणावर क्लिक करून महिलाही आपत्कालीन संदेश पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. हे ॲप सुमारे 5 लाख नागरिकांनी डाउनलोड केलं आहे.

भोरोक्सा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२३ मध्ये या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं. या ॲपमधील 181 क्रमांक डायल केल्यास आपत्कालीन संदेश पोलिसांपर्यंत पोहोचतो. या ॲपमध्ये कॉल बॅक सिस्टीमची सुविधा असून, पोलीस अपघातस्थळी सहज पोहोचून संबंधित व्यक्तीला वाचवू शकतात. या ॲपमध्ये पॅनिक बटण आहे.

महिलासांठी हेल्पलाइन : मध्य प्रदेश सरकारनं महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1090 सुरू केला आहे. महिला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हा नंबर डायल करू शकतात. मध्य प्रदेश पोलिसांनी आणखी एक टोल फ्री क्रमांक 1019 सुरू केला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तुम्हाला पोलिसांची संपर्क साधता येणार आहे. 0755-2443801 आणि 2420026 वर तक्रार करण्याची सुविधा देखील आहे. महिला सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं एमपी ई-कॅप ॲप लाँच केलंय. यावर 100 डायल करून तक्रारी नोंदवता येणार आहे. तसंच 4 दाबून एसओएस संदेश पोलिसांना पाठवता येणार आहे. हे ॲप Google Play Store वरून डाउनलोड केलं जाऊ शकतं. तसंच महिला 181 CM हेल्पलाइनवर कॉल करून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

राज महिला सुरक्षा : हे राजस्थानमधील सर्वात लोकप्रिय महिला संरक्षण ॲप आहे. प्लेस्टोअरवरून ते सहज डाउनलोड करता येतं. या ॲपमधील GPS- सुविधेमुळं संबंधित महिलेचा संदेश पोलिसांना सहज कळू शकतो. 7300363636 आणि 7891091111 हे दोन हेल्पलाइन क्रमांक राजस्थान पोलिसांच्या मदतीनं सुरू करण्यात आले आहेत.

SHE टीम्स QR कोड : हे तेलंगणा पोलीसांचं ॲप आहे. जे महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वापरलं जातं. महिला या ॲपचा वापर करून सहजपणे तक्रार करू शकतात.

घरगुती हिंसाचार ॲप : हे ॲप कोरोनाच्या कालावधीपासून सुरू करण्यात आलं. जर एखाद्या महिलेला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला तर, ती या ॲपद्वारे तक्रार नोंदवू शकते. 8886640100 या नंबरवर महिलांना समुपदेशन हवं असल्यास त्याचीही सुविधा या ॲपमध्ये देण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आरजी कार वैद्यकीय रुग्णालयात सीआयएसएफचे जवान तैनात - Doctor Murder Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.