हैदराबाद Bajaj Pulsar N125 Unveiled : नवीन बजाज पल्सर N125 लवकरच लॉंच होणार आहे. लॉन्चपूर्वी बजाज कंपनीनं सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये बाईकच्या माहितीसोबतच काही फीचर्सचीही माहिती देण्यात आली आहे. बजाज कंपनीन नवीन Pulsar N125 चा नवा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या टीझरमध्ये त्याच्या अनेक वैशिष्ट्यांची माहिती उपलब्ध आहे.
काय खास असेल : या बाईकचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये बाइक पूर्णपणे दाखवण्यात आली आहे. बाईक अनेक रंगांच्या पर्यायांसह आणली जाईल. टीझरमध्ये दर्शविलेले दुचाकी चकचकीत दिसतेय. त्यात हनीकॉम्ब शैलीचे ग्राफिक्स आहेत. तसंच, बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक, फ्रंट फोर्क्सवर प्लास्टिक कव्हर, स्प्लिट सीट, सिल्व्हर कलरची ग्रॅब रेल मिळण्याची शक्यता आहे.
किती शक्तिशाली इंजिन : सध्या फक्त बाइक सादर करण्यात आली आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये येत असलेल्या या बाईकला सामान्य पल्सर 125 पेक्षा अधिक शक्तिशाली इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. दुचाकीच्या 125 सीसी इंजिनमधून 11.8 पीएस पॉवर, 10.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.
किती असेल किंमत : येत्या काही दिवसांत ही बाईक अधिकृतपणे लाँच होणार आहे. अशा परिस्थितीत, किमतीची योग्य माहिती लॉंचच्या वेळीच उपलब्ध होईल. पण याची एक्स-शोरूम किंमत 90 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही बाईक 1245 सीसी सेगमेंटमध्ये अधिक पॉवरसह लॉंच होईल. अशा स्थितीत ती Honda Shine 125, Hero Xtreme 125, TVS Raider 125 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :