हैदराबाद WORLD FIRST CNG BIKE : भारत वाहन तंत्रज्ञान क्षेत्रात वेगानं वाटचाल करत आहे. वाहनं चालवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून CNG वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यासाठी बजाज ऑटोनं CNG दुचाकी तयार करण्याचं काम सुरू केलंय. बजाजनं अलीकडंच आपली फ्रीडम 125 CNG04 ही जगातील पहिली CNG दुचाकी लॉन्च केली आहे.
दुचाकीचं बुकिंग जोरात सुरू : त्यामुळं फ्रीडम 125 दुचाकीनं ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दुचाकीचं बुकिंग सध्या जोरात सुरू आहे. तसंच, लॉन्च झाल्याच्या पहिल्या आठवड्यात 30 हजारांहून अधिक लोकांनी बजाजच्या शोरूमला भेट दिलीय. ग्राहक या दुचाकीबद्दल माहिती घेत असून एकाच आठवड्यात 6 हजार ग्राहकांनी दुचाकी बुक केलीय. एवढंच नाही तर गाडीचं बुकिंग शहरनिहाय वाढवण्यात आलं आहे. पुढील महिन्यात दुचाकीची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सीएनजीसह पेट्रोल भरता येणार : फ्रीडम 125 दुचाकीत एकाच वेळी दोन किलो सीएनजी तसंच दोन लिटर पेट्रोल भरता येणार आहे. फ्रीडम 125 दुचाकी दोन किलोच्या CNG वर 200 किमी धावू शकणार आहे. तसंच अतिरिक्त दोन लिटर पेट्रोलवर एकूण 330 किमी प्रवास करण्यासाठी ही दुचाकी डिझाइन केल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच, फ्रीडम 125 सीएनजी दुचाकीची किंमत सामान्य 125 सीसीच्या दुचाकीपेक्षा निम्मी असेल, असं बजाजनं म्हटलंय.
दुचाकी टेलिस्कोपिक सस्पेंशननं सुसज्ज : या दुचाकीच्या डिझाईनसाठी, सिंगल-पीस सीट प्रदान करण्यात आलंय. सीएनजी टँक दुचाकीच्या सीटखाली बसवण्यात आली आहे. पुढचा भाग 125mm टेलिस्कोपिक सस्पेंशननं सुसज्ज आहे. मागील बाजूस 120mm मोनोशॉप सस्पेंशन सिस्टम आहे. याशिवाय एलईडी हेडलाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लक्षवेधी काळ्या अलॉय व्हील सारखी वैशिष्ट्ये या दुचाकीत डिझाइन करण्यात आली. बजाज फ्रीडम 125 दुचाकी लाल, चंदेरी, पिवळा, काळ्या रंगासह पाच रंगांच्या पर्यायांसह तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. या दुचाकीची किंमत 95 हजार ते 1.10 लाख रुपये असेल. यामुळं संपूर्ण भारतात या दुचाकीची विक्री वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :