हैदराबाद Why iPhone 16 banned : ॲपलची नुकतीच Apple iPhone 16 सीरीज बाजारात लॉन्च झाली होती. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक रात्रभर रांगेत उभे राहिल्याचं मुंबईत दिसून आलं होतं. मात्र, इंडोनेशियानं Apple iPhone वर बंदी घातलीय. तसंच, iPhone 16 सीरीज बेकायदेशीर असल्याचं घोषित केलंय. इंडोनेशियाकडून iPhone 16 ची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
का घातली बंदी? : इंडोनेशिया सरकारनं अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण स्पष्ट झालं आहे. 'ॲपल कंपनीनं इंडोनेशियामध्ये काही अटी आणि ठराविक रकमेच्या गुंतवणुकीसाठी सहमती दर्शवली होती, परंतु या गुंतवणुकीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळं ही बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशियाचे उद्योगमंत्री अगुस गुमिवांग कार्तासस्मिता यांनी मंगळवारी सांगितलं. 22 ऑक्टोबर रोजी या संदर्भात एक घोषणा करण्यात आली. iPhone विक्री, बंदीसोबतच नागरिकांना परदेशातून हे उपकरण खरेदी न करण्याचा इशाराही देण्यात आला.
TKDN प्रमाणपत्राचा विस्तार प्रलंबित : कंपनीनं 1.71 ट्रिलियन रुपयांपैकी 1.48 ट्रिलियन ($95 दशलक्ष) ची गुंतवणूक इंडोनेशियामध्ये केली आहे. जी एकूण निर्धारित रकमेपेक्षा कमी आहे. याव्यतिरिक्त, "Apple च्या iPhone 16 ला सध्या इंडोनेशियामध्ये विकण्याची परवानगी नाही. कारण TKDN प्रमाणपत्राचा विस्तार अद्याप प्रलंबित आहे. तसंच कंपनीकडून पुढील गुंतवणूक देखील बाकी आहे," असं उद्योग मंत्री म्हणाले. ॲपलचे सीईओ टिम कुक म्हणाले की, ॲपल इंडोनेशियामध्ये संशोधन आणि विकासासाठी सुविधा उभारण्याचा विचार करत आहे. जकार्ता येथे झालेल्या बैठकीत त्यांनी अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी संभाव्य उत्पादन योजनांवर चर्चा केली होती.
उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबतही चर्चा : ॲपलसाठी हा अतिशय आश्चर्यकारक आहे. कारण टीम कुकनं इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला तेव्हा ही भेट चांगलीच रंगली होती. बैठकीनंतर कुक यांनी इंडोनेशियामध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबतही चर्चा केली. आता सरकारच्या या निर्णयाचा कंपनीवर परिणाम होऊ शकतो. Apple iPhone 16 सीरीज लोकांना खूप आवडली आहे. कंपनीनं या वर्षीच्या 16 मालिकेत अनेक छान वैशिष्ट्ये देखील जोडली आहेत.
हे वाचंलत का :