हैदराबाद : ऍपलनं ऍपल इंटेलिजेंसचं नविन फिचर आणलं आहे. याबाबत ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी 'X' वर घोषणा केली होती. 18.1 ऍपल इंटेलिजेंस आता iPhone, iPad आणि Mac वर उपलब्ध आहे. वापरकर्ते नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट (iOS 18.1, iPadOS 18.1, आणि macOS Sequoia 15.1) सह Apple Intelligence वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
Apple Intelligence is here! 🎉 Starting today, you can get more done on iPhone, iPad, and Mac with powerful new features, including system-wide Writing Tools, a more conversational Siri, intelligence in photos, and so much more. This is the beginning of an exciting new era.
— Tim Cook (@tim_cook) October 28, 2024
दुसरं मोठं सॉफ्टवेअर अपडेट : iPhone 16 मालिका लॉंच केल्यानंतर, Apple नं दुसरं मोठं सॉफ्टवेअर अपडेट iOS 18.1 आणलं आहे. Apple च्या नवीनतम iPhone सीरीज लाँच करताना, कंपनीनं Apple Intelligence नं सुसज्ज iOS 18.1 अपडेट ऑक्टोबरमध्ये रिलीज केलं जाईल, असं म्हटलं होतं. गेल्या महिन्यात, कंपनीनं आपल्या 27 iPhones साठी iOS 18 आणलं. आता हे वापरकर्ते नवीनतम iOS 18.1 अपडेट देखील डाउनलोड करू शकतील.
अपग्रेडेड सिरीसह जारी : आयफोनसाठी iOS 18.1 व्यतिरिक्त, iPad साठी iPadOS 18.1 आणि MacOS Sequoia 15.1 देखील Mac वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहेत. हे सर्व अपडेट्स ऍपल इंटेलिजेंस आणि अपग्रेडेड सिरीसह जारी करण्यात आले आहेत. तथापि, Apple Intelligence फक्त नवीनतम iPhone 16 आणि iPhone 15 Pro मालिकेतील वापरकर्त्यांना वापरता येईल. त्याच वेळी, केवळ M3 चिप असलेले iPad वापरकर्ते ऍपल इंटेलिजेंस वापरण्यास सक्षम असतील. ॲपलच्या एआय वैशिष्ट्यांसाठी नवीनतम चिप असणं अनिवार्य आहे.
Apple Intelligence : Apple Intelligence चे अनेक फीचर्स डिसेंबर पासून यूजर्ससाठी उपलब्ध होतील. सध्या वापरकर्त्यांच्या आयफोन, आयपॅड आणि मॅकच्या लेखन टूल्समध्ये एआय फीचर उपलब्ध असेल. तसंच, AI चा प्रभाव फोटो ॲपमध्ये देखील दिसेल. AI आता विशेषतः अल्बम आयोजित करण्यात मदत करेल. इतकंच नाही तर ॲपल इंटेलिजेंस वापरकर्त्यांना ई-मेल, मीटिंग इत्यादींना प्राधान्य देण्यासाठी मदत करणार आहे.
ऍपल इंटेलिजन्स कसं सक्षम करावं? : Apple Intelligence सध्या यूएस मध्ये iOS 18.1, macOS 15.1 आणि iPadOS 18.1 सह लॉंच केलं आहे. ऑपरेटिंग सिस्टम अपडेट डाउनलोड केल्यानंतर, नवीन वैशिष्ट्ये प्राप्त करण्यासाठी वापरकर्त्यांना Apple Intelligence मध्ये निवड करावी लागेल. तुमच्या iPhone वर, सेटिंग्ज > Apple Intelligence आणि Siri वर जा आणि Apple Intelligence साठी टॉगल सक्षम करा.
हे वाचलंत का :