ETV Bharat / state

बाबा सिद्दीकींना काँग्रेसचा धक्का; आमदार झिशान सिद्दीकींना 'या' पदावरुन हटवलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 12:30 PM IST

Zeeshan Siddique Removed बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी हे देखील काँग्रेसला सोडणार असल्याच्या चर्चा करण्यात येत होत्या. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस पक्षानं सावध पवित्रा घेत आमदार झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरुन हटवलं आहे.

Zeeshan Siddique Removed
संपादित छायाचित्र

मुंबई Zeeshan Siddique Removed : काँग्रेसचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेतृत्वानं आमदार झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. त्यामुळं मुंबई काँग्रेसमधील राजकारण आणखी पेटणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

झिशान सिद्दीकी यांना पदावरुन हटवलं : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला 'हात' दाखवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. बाबा सिद्दीकी यांना मुंबई शहरातील मातब्बर नेते मानलं जात होतं. मात्र त्यांनी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. त्यातच त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडून जाणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता. "मी कुठंही जाणार नाही," असं झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दीकी यांना हटवण्यात आलं आहे.

बाबा सिद्दीकी यांनी दाखवला काँग्रेसला 'हात' : मुंबई शहरात अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांचं नाव घेतलं जाते. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळं अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईत काँग्रेसला दुसरा धक्का? सिद्दीकी पिता-पुत्र काँग्रेसचा 'हात' सोडण्याच्या तयारीत
  2. Hijab Controversy : हिजाब गर्ल 'मुस्कान' खानची महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराने घेतली भेट, शोर्याचे केले कौतूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.