ETV Bharat / state

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात छत्रपती संभाजी नगरातील तरुणाचा सहभाग - Salman Khan - SALMAN KHAN

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याची घटना घडली होती. त्या अगोदर त्याच्या फॉर्म हाऊसची रेकीही करण्यात आली होती. याच्या मागे मास्टरमाइंड म्हणून बिश्नोई गँग कार्यरत होती असं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजी नगर येथील जालान नगर येथे राहणाऱ्या वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 2:37 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - Salman Khan :अभिनेता सलमान खान यांच्या घरावर हल्ला प्रकरणात छत्रपती संभाजी नगर येथे त्याचे धागेदोरे सापडले आहेत. शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना याचा या घटनेत सहभाग होता. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तर बिष्णोई गॅंगमध्ये असलेल्या लोकांबरोबर तो सातत्याने संपर्कात असल्याचं देखील उघड झालं आहे.

वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना हा छत्रपती संभाजी नगर शहरातील रहिवासी?

बिष्णोईच्या सदस्यांशी संपर्कात असलेला वसीम चिकना हा मूळ शहरातील जालान नगर येथील रहिवासी आहे. तो सातत्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वास्तव्यास होता. सलमान खानच्या घरावर हल्ला करण्याच्या कटात त्याला, फार्म हाउसची रेकी करणे, काडतूस आणि शस्त्राची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे तो फार्म हाऊसच्या परिसरात भाड्याची खोली देखील शोधत होता. तर त्याचा एक भाऊ हॉटेलमध्ये काम करत असून अनेक वर्षांपासून तो मुंबईलाच राहतो. एका वेळी त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात वसीम अटकेत

14 एप्रिल च्या पहाटे अभिनेता सलमान खान यांच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून सहा संशयितांना अटक करण्यात आली. त्यावेळी केलेल्या तपासात सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापण यांनी हल्लेखोरांना जवळपास 40 काडतुसह दिली होती. तर सागर पाल याला चार मॅगझिन आणि 40 काडतूसे दिली. त्यातल्याच पाच गोळ्या सलमान खान त्याच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोरांनी सलमान खानच्याच फार्म हाऊसवर देखील हल्ल्यात करण्याचं नियोजित होतं. त्यामध्ये पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह, धनंजय सिंग, तापेसिंग, अजय कश्यप, गौरव भाटिया, इलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली आहे.

हेही वाचा -

  1. सलमान खानवर हल्ला करण्याच्या कटातील आरोपीला हरियाणातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई - SALMAN KHAN NEWS
  2. पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl
  3. सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शवविच्छेदन अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी - Salman khan house firing case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.