मुंबई Salman Khan Firing Case : 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. गोळीबार प्रकरणी गुजरात राज्यातील भुज येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी हे प्रकरण अद्याप थंडावलेलं दिसत नाहीय. बुधवारी 17 एप्रिल रोजी एक कॅब ड्रायव्हर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर आला. त्यानं लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी तिथं असलेल्या पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईचं नाव ऐकताच कॅब ड्रायव्हरला तात्काळ ताब्यात घेत वांद्रे पोलिस ठाण्यात नेलं.
कॅब बुक करणाऱ्याला अटक : गाझियाबादमधील अज्ञातानं कॅब बुक केली. लॉरेन्स विश्नोईला गॅलेक्सी अपार्टमेंटमधून घेण्यास सांगितलं, असं तपासात समोर आलं. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासानंतर कॅब बुक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील 20 वर्षीय आरोपी रोहित त्यागीला अटक करण्यात आली आहे. त्याची कार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं अभिनेता सलमान खानच्या निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सपासून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत बुक करण्यात आली होती. त्याला दोन दिवसांसाठी वांद्रे पोलिसांच्या कोठडी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सलमान खान भारतात नसून तो परदेशात गेल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता सलमान खानला वाय प्लस सुरक्षा असतानाही रविवारी त्याच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्यानं मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 48 तासांत आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुजरात राज्यातील भुज येथून ताब्यात घेतलं.
हे वाचलंत का :
- सलमान खान गोळीबार प्रकरण : वांद्रे पुलाखाली पिस्तूल पुरवणारी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर - Salman Khan firing case
- दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing
- सलमानच्या जीवावर उठलेल्यांना सलीम खाननी म्हटलं 'जाहिल लोग', मुंबई पोलिसांचं केलं कौतुक!! - Salman Khan