ETV Bharat / state

कामावरुन कमी केल्याचा राग; कामगाराची उद्योजकाला मारहाण, पोलिसांनी ठोकल्या हल्लेखोरांना बेड्या - Worker Beaten To Businessman

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 12:11 PM IST

Worker Beaten To Businessman : कामावरुन काढून टाकल्यानं कामगारानं उद्योजकाला मारहाण केली. या प्रकरणी कामगारांसह त्याच्या साथिदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या मारहाणीत उद्योजकाच्या हाताचं हाड मोडलं असा दावा उद्योजकानं केला आहे.

Worker Beaten To Businessman
कामगार (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Worker Beaten To Businessman : कामावरुन काढल्याच्या रागातून कामगारानं एका उद्योजकाला बेदम मारहाण केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये घडली. नागेश्वर मुळे असं मारहाण करण्यात आलेल्या उद्योजकाचं नाव आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर पवार, राहुल पवार आणि चार अनोळखी अशी संशयित आरोपींची नावं आहेत. उद्योजकाला मारहाण केल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत उद्योजक नागेश्वर मुळे यांच्या हाताचं हाड मोडलं आहे.

कामगाराला कामावरून केलं कमी : वाळूज महानगरच्या सिडको वसाहतीतील नागेश्वर रमेशराव मुळे यांची सोनखेडा लक्ष्मी मिल्क या नावानं कंपनी आहे. या कंपनीत त्यांनी दूध विक्री आणि व्यवसायाच्या कामासाठी 42 जणांना कामावर ठेवलेले आहेत. महिनाभरापूर्वी नागेश्वर मुळे यांनी राहुल पवार या तरुणास मार्केटिंगच्या कामासाठी नेमलं. मार्केटिंगचं काम करताना राहुलनं व्यावसायिक मुळे यांचे जालना येथील वितरक तुषार भालेराव यांना तुम्ही कंपनीचा माल खरेदी करा, त्याचे पैसे मुळे यांना देऊ नका, असं फोन करून सांगितलं. मात्र, वितरक भालेराव यांनी मुळे यांना राहुलसोबत झालेल्या संभाषणाची कॉल रेकार्डिंग पाठवून दिली. हा प्रकार लक्षात येताच मुळे यांनी 19 जून रोजी राहुल यास जाब विचारला. त्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकलं.

कामगारानं मालकाला केली मारहाण : कामावरुन कमी केल्यानं संतप्त झालेल्या राहुल पवारनं उद्योजक मुळे यांना धडा शिकवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी रविवारी दुपारी एकच्या सुमारास व्यावसायिक मुळे बजाजनगर येथील त्यांच्या कार्यालयात कामकाजात व्यस्त होते. तेव्हा त्यांना शंकर पवार या व्यक्तीनं फोन करून कार्यालयाच्या बाहेर बोलावून घेतलं. मुळे कार्यालयाच्या बाहेर आले. काही वेळानं राहुल पवार हा दुचाकीवर आपल्या चार साथीदारांसह घटनास्थळी येऊन पोहचला. शंकर पवार यानं मुळे यांना 'तू राहुल यास कामावरून का काढलं', असा जाब विचारला. त्यानंतर शंकर पवार, राहुल पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी मुळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केल्याचा आरोप मुळे यांनी केला. मुळे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली, तेव्हा त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेऊन मुळे यांची सुटका केली. या मारहाणीत मुळे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाचं हाड मोडलं असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्या तक्रारी नंतर एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. मोक्काच्या गुंडाकडून चौघांना अमानुष मारहाण; वराहाला मारल्याच्या राग, सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल - Youth Beaten By Goons
  2. इन्स्टाग्रामवर 'गे' म्हणल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, मोडले नाकाचे हाड - BEATING FRIEND ON INSTAGRAM comment
  3. शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रकरण आलं समोर - Teacher Beaten Student Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.