ETV Bharat / state

लोकलच्या गर्दीत हात सुटला अन् आयुष्य संपलं; धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू - LOCAL ACCIDENT

लोकलच्या गर्दीचा प्रश्न अत्यंत भीषण झाला आहे. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कदायक घटना घडली आहे. धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.

Local Accident
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 4:28 PM IST

ठाणे : अंबरनाथ स्थानकानजीक धावत्या लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलीय. तर आधिकचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. ऋतुजा गणेश जंगम असं या महिलेचं नाव असून ती कर्जतला राहात असल्याची प्राथमिक माहिती, रेल्वे पोलिसांनी दिलीय.

कशी घडली घटना : रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतुजा जंगम कर्जत शहरात कुटुंबासह राहत होती. ती ठाण्याला एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला होती. नेहमीप्रमाणे २२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ठाण्याहून कर्जत लोकलनं घरी परतताना, अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीमुळं ती लोकलमधून खाली उतरून पुन्हा लोकलमध्ये चढली. पण यावेळी तिला गर्दीमुळं बोगीच्या आत जाताच आलं नाही आणि ती दारात उभी राहिली. परंतु, गर्दी जास्त असल्यानं ऋतुजाचा हात सुटला आणि ती लोकलमधून खाली पडली.

लोकल उशिरानं धावली : अंबरनाथ स्थानकातून सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी कर्जत लोकल सुटते. पण मंगळवारी ही लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिरानं धावली. त्यातच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही लोकल अंबरनाथ स्थानकातून निघाली होती. अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान गर्दीमुळं ऋतुजा गणेश जंगम लोकलमधून खाली पडली.

पुढील तपास सुरू : दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे ऋतुजाला मृत घोषित करण्यात आलं. या अपघाताची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. तर घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. दुसरीकडं मृत ऋतुजा राहत असलेल्या परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. व्हिडिओला लाईक्स मिळावे म्हणून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; ट्रेनमधून पडल्यानं हात-पाय तुटले, व्हिडिओ व्हायरल - Mumbai Local Train Stunt Video
  2. कल्याण स्थानकावर लोकलचा डबा रुळावरून घसरला, चाकरमान्यांची तारांबळ
  3. kalyan local Train : ... अन् प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल ट्रेन थांबवली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.