ETV Bharat / state

मनोहर भिडेंच्या प्रतीकात्मक मिश्या कापत 'जोडो मारत आंदोलन', 'त्या' वक्तव्यानं महिला कॉंग्रेसचा संताप अनावर - WOMAN CONGRESS PROTEST - WOMAN CONGRESS PROTEST

Woman Congress Protest : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे अध्यक्ष मनोहन भिडे यांनी आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री मिळालं आहे, असे वक्तव्य केलं. तसेच महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून मनोहर भिडे यांच्या प्रतिकात्मक मिश्या कापत त्यांच्या प्रतिमेला जोडो मारत आंदोलन करण्यात आलं आहे.

Woman Congress Protest
मनोहर भिडे निषेध (etv bharat reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 2:34 PM IST

पुणे Woman Congress Protest : पुण्यातील फडके हौद येथे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीनं आज (3 जुलै) मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, "मनोहर भिडे यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही, आमची मागणी आहे. तसेच स्वातंत्र्याबद्दल अपशब्द वापरले आहेत, त देखील निषेधार्थ आहे. आज आम्ही प्रतीकात्मक स्वरूपात भिडे यांच्या मिश्या कापण्याचं काम केलं आहे. ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही, अशा व्यक्तीला मिश्या ठेवायचा अधिकार नाही."

भाजपाचा बोलवती धनी भिडेच : यावेळी काँग्रेस उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, "मनोहर भिडे यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्य आहे. आज एवढं वक्तव्य करून भाजपाकडून काहीही बोललं जात नाहीये. याचा अर्थ भाजपाचं भिडे यांना समर्थन आहे. राज्याचे गृहमंत्री आत्ता कुठे गेले ते का याबाबत बोलत नाहीय. याचा अर्थ भाजपा हा बोलावता धनी आहे," असे यावेळी तिवारी म्हणाल्या.

मनोहर भिडेंचा निषेध करताना कॉंग्रेस पक्ष (etv bharat reporter)

भाजपा शहराध्यक्षाला पोलीस संरक्षण? : संसदमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरात राहुल गांधी यांच्या विरोधात पोस्टर लावले आहे. याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, " भीती दाखवता याचा अर्थ तुम्ही हिंदू नाही. हिंदू कधीही असं करत नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. भाजपाकडे कोणताही मुद्दा नसल्यानं त्यांनी शब्दांची फिरवाफिरवी करत हे पोस्टर छापले आहे. आजकाल भाजपा शहराध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन बाहेर फिरत असतात, " असे वक्त व्य यावेळी अरविंद शिंदे यांनी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याबाबत केलं आहे.

हेही वाचा :

  1. जादू‌टोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा, हाथरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसची मागणी - Anti Witchcraft Law
  2. "मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, पालकमंत्री बेपत्ता", पालकमंत्री नाही थाऱ्यावर, जनतेला सोडलं वाऱ्यावर, बॅनरमधून उडवली मंत्र्यांची खिल्ली - Shambhuraj Desai Missing Banner
  3. कोपर्डे गावात दोन भावांचा शॉक लागून मृत्यू - Two brothers died of shock

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.