पुणे Wife and daughter killed : पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक कारणाने पतीने पत्नी आणि मुलीला चाकूने वार करून आणि उशिने तोंड दाबून खून केल्याचा प्रकार घडला आहे. आज (16 मार्च) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून पतीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यावर स्वतः हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
'ही' आहेत मृतांची नावे : श्वेता तळेवाले (वय ४०), शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या दोघांची नावे असून अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणाऱ्या पती आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
पत्नीने माहेरी जाण्याची दिली होती धमकी : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून आर्थिक कारणावरून सतत भांडण व्हायची आणि वाद देखील होत होते. काल रात्री असाच वाद झाला आणि तेव्हा पत्नीने मी तुम्हाला सोडून माहेरी निघून जाईल असं सांगितलं. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली. त्यानंतर उशिने तोंड दाबून तिचा खून केला. हे सर्व घडत असताना मुलगी देखील त्या ठिकाणी आली. मुलगी भांडण झाल्यानंतर नेहमी आईची बाजू घेत असल्यानं त्याचा राग आरोपीच्या मनात होताच. तेव्हा त्याने तिचाही तोंडावर उशी दाबून खून केला. या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहे.
पत्नीचा उशीने तोंड दाबून खून : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात बुधवारी 19 मे, 2021 रोजी पतीने आपल्या पत्नीला उशीने तोंड दाबून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती हा गुरुवारी 20 मे च्या मध्यरात्री शेगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले. संजीवनी आढाव असे मृत पत्नीचे नाव असून आरोपी पतीचे नाव कैलास आढाव असे होते.
हेही वाचा:
- Sanjay Raut: "पंतप्रधान नरेंद्र मोदी फादर ऑफ करप्शन, भाजपा आणि त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीगची केस करुन अटक करा"- संजय राऊत
- Rahul Gandhi: इलोक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
- Anuradha Paudwal Join Bjp : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश