मुंबई Exercise Safety : उत्तम आरोग्यासाठी तरुण पिढी जिममध्ये किंवा घरी व्यायाम करतात. परंतु व्यायाम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा दुष्परिणामा होतात. तसेच हृदयविकाराच्या आजारात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथे जिममध्ये जिम करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येवून त्याचा मृत्यू झाला. यामुळे जिम करताना कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊ.
यांना बळी पडू नका: सध्या सिक्स पॅकची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. बलदंड शरीर कमवण्यासाठी अतिरिक्त व्यायाम केला जातो. पण हा अतिरिक्त व्यायाम कधीकधी आपल्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे सध्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. तसंच सिक्स पॅकच्या नादात आपला जीव गमावू नका. आपणाला आनुवंशिक काही आजार आहे का? याचीही तपासणी केली पाहिजे. जर एखाद्याच्या आई-वडिलांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर त्यानं व्यायाम करताना हृदयविकारतज्ञ यांच्याकडे जाऊन कोणत्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे, याचा सल्ला घ्यावा. त्यामुळे निश्चितपणं कुठलाही धोका होणार नाही, असं आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.
डॉक्टराच्या सल्ला घ्या: आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते. परंतु हा व्यायाम कसा करायचा? कधी करायचा? कुठल्या प्रकारे करायचा? याला काही मर्यादा आहेत. जिम्नॅस्टिकमधील व्यायामानं आपल्या हृदयावर ताण पडतो. हृदयावर ताण पडल्यामुळे हृदय काम करत नाही. आपल्या शरीरात जेवढे रक्त आहे, तेवढं बाहेर फेकलं जात नाही. रक्तदाब कमी होऊन दम लागतो. त्यामुळे व्यक्तीचे हृदय बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करताना काळजी घेतली पाहिजे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानंच व्यायाम केला पाहिजे, असं आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे.
वय, आजार आणि शरीराचा विचार करा: आपण शरीरासाठी आणि निरोगी राहण्यासाठी निश्चितपणे व्यायाम केला पाहिजे. पण व्यायाम करताना आपले वय किती? आपणाला कोणते आजार आहेत? आपले शारीरिक रचना कशी आहे? याचा विचार करून व्यायाम करावा. यासाठी एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानंच वरील सर्व गोष्टीचा विचार करून व्यायाम करावा. डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांचाशी चर्चा करूनच व्यायाम केला तर कोणतेही अनुचित घटना घडणार नाही, असेही आरोग्यतज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा