मुंबई Sanjay Raut - मुंबई दोऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बॉम्बेचं नामकरण मुंबई करण्यात त्यांचाही सहभाग असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. यासोबत त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते मुंबईत बोलत होते.
यापुढेही बलिदान देण्याची तयारी - दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बॉम्बेचं नामकरण मुंबई करण्यात त्यांचा देखील हात असल्याचं म्हटलं होतं. यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईचं नामांतर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही लढा दिला. अनेक आंदोलनं उभी केली असा दावा राऊत यांनी केला आहे. शिवसेनेनं यासाठी अनेक आंदोलनं उभारली. बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात यावं ही मागणी सातत्याने लावून धरल्यानंतर त्या लढ्याला यश आलं. याकरता बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचं ऐकल्यानंतर आम्ही सर्व त्यांना हसत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बॉम्बेचं नामकरण मुंबई करण्यासाठी 105 मराठी बांधवांनी बलिदान दिलं असून ते विसरता येणार नाही. यापुढे देखील असं बलिदान देण्याची मराठी माणसाची तयारी असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला - अजित पवार यांच्या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक हरणार हे नक्की आहे, हे त्यांना सुद्धा माहीत आहे. जे तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि तुमच्या वडिलांप्रमाणे आहेत असे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिलं. परंतु तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा परिस्थितीत आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही, असं सांगत संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 40 लोक हे ढोंगी असून भाजपा, शिंदे तसंच अजित पवार यांच्यावर बुरखे वाटप करण्याची वेळ आली असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा...