ETV Bharat / state

पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला होणार कमी दाबानं पाणीपुरवठा - BMC Water Supply Disrupted

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 2:47 PM IST

BMC Water Supply Disrupted : मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील (पंपिंग स्टेशन) संयंत्रात बुधवारी (19 जून) दुपारी 2.50 च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळं मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागात पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिलीय.

water supply disrupted in parts of mumbai city and eastern suburbs
मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला होणार कमी दाबानं पाणीपुरवठा (Source ETV Bharat)

मुंबई BMC Water Supply Disrupted : मुंबई शहरासह पूर्व उपनगरातील नागरिकांना पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आधीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलसाठ्यांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्यानं दहा टक्के पाणी कपात सुरू आहे. त्यातच आता पिसे येथील पंपिंग केंद्रात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यानं हा बिघाड दुरुस्त करेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिलीय. त्यामुळं नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलय.

पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये 19 जून रोजी बुधवारी दुपारी 2.50 च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. या तांत्रिक बिघाडामुळं पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये असलेल्या 20 पंपांपैकी 13 पंप बंद पडले. तेव्हापासून, पंप पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. तर ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसंच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी, भंडारवाडा जलाशयांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर पिसे येथील तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाल्याचं पालिकेनं म्हटलंय.

तसंच भिवंडी, ठाणे, बाह्य नगर विभागाला 2 आणि 3 जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठासुद्धा कमी दाबानं होणार आहे. तर उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा कमी दाबानं केला जाणार असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय. मात्र, असं असलं तरी समाधानाची बाब म्हणजे बुधवारी संध्याकाळ सात वाजेपर्यंत बिघडलेल्या 13 पंपांपैकी 10 पंप पुन्हा सुरू करण्यात यश आलं असून, उर्वरित तीन पंपांचं कामकाज पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय.

सहा महिन्यांमध्ये दुसरी घटना : पिसे येथील पंपिंग स्टेशनवरील बिघाडामुळं मुंबईचा पाणीपुरवठा खंडित होण्याची ही मागील सहा महिन्यांमध्ये दुसरी घटना आहे. याआधी 26 फेब्रुवारीला पिसे येथील पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळं 20 पैकी 14 पंप काम बंद पडले होते. या पंपांमधील बिघाड दुरुस्त होईपर्यंत काही कालावधीसाठी पालिकेनं 15 टक्के पाणी कपात जाहीर केली होती.

हेही वाचा -

  1. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 16 टक्केच पाणी! 'या' तारखेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन - Water Shortage In Mumbai
  2. देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट; 'या' दिवशी गोरेगाव विभागाचा पाणीपुरवठा होणार 24 तासांसाठी बंद - BMC Water Supply
  3. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पालिकेचा जलसाठा आला निम्म्यावर, आजपासून पाणीकपात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.