ETV Bharat / state

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! जायकवाडी धरणातील पाणीसाठा 95.49 टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार पाण्याचा विसर्ग - Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95.49 टक्के झाला असून, कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jayakwadi Dam
जायकवाडी धरण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 3:32 PM IST

Updated : Sep 8, 2024, 3:50 PM IST

छत्रपती संभाजीनगर Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी धरणच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळं रविवारी सकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी 95.49 टक्क्यांवर पोहोचली. सध्या या धरणात 18 हजार 71 क्युसेक इतकी आवक आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येऊ शकतं. आवक वाढल्यास हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जायकवाडी धरण भरल्यामुळं मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला.

दुष्काळी भागाला मिळणार दिलासा : मराठवाड्यातील महत्त्वाचं मानलं जाणारं जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेनं भरलंय. त्यामुळं नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती गोदावरी पाटबंधारे विभाग तर्फे देण्यात आली. यंदा गोदावरी नदी पात्रात चांगला पाऊस झाला, तर नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळं धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला.

पाणी सोडण्याचा होणार निर्णय : धरणात जवळपास 90 टक्के पाणीसाठा होईपर्यंत पाण्याची आवक चांगली होती. मात्र, नंतर पाऊसानं विश्रांती घेतली आणि आवक कमी झाली. सध्या संथ गतीनं पाणी धरणात येत आहे, रविवारी सकाळी जवळपास 95.49% टक्के इतका पाणीसाठा झाला. 96 टक्के धरण भरल्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. त्यानुसार आता कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी आवक पाहूनच पाणी सोडण्यात येणार. त्यामुळं आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्यात कोणीही उतरू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं.

हेही वाचा

  1. व्यावसायिकाला रात्रभर डांबून घेतली लाच; सीबीआयनं जीएसटी अधीक्षकासह तिघांना ठोकल्या बेड्या - CBI Arrested CGST Superintendent
  2. लाडकी बहीण योजना : 50 हजाराहून अधिक लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात मिळाला लाभ, आता महापालिकेनं केलं 'हे' आवाहन - Ladki Bahin Yojana
  3. शंभर वर्षे जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू, तर तीन जण गंभीर - Amravati Building Collapsed

Last Updated : Sep 8, 2024, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.