ETV Bharat / state

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 16 टक्केच पाणी! 'या' तारखेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन - Water Shortage In Mumbai - WATER SHORTAGE IN MUMBAI

BMC Water Supply : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात सध्या केवळ 16.48 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळं देशाच्या आर्थिक राजधानीला आता पाणी संकटाचा सामना करावा लागतोय.

Water Shortage In Mumbai
देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 7:37 PM IST

मुंबई BMC Water Supply : देशाची आर्थिक राजधानी पाणी संकटात असल्याच्या बातम्या ईटीव्ही भारतने यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, प्रत्येकवेळी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईत पाण्याची कमतरता नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. तसंच राज्य सरकार अतिरिक्त पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती उत्तर पालिका अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देण्यात आली. मात्र, आता अखेर पालिका प्रशासनानं मुंबईत पाण्याची कमतरता असल्याचं मान्य केलंय. तसंच 31 जुलैपर्यंत मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय. यासंदर्भात महानगरपालिकेनं प्रसिध्दीपत्रक काढलं असून, यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे कशा पद्धतीनं नियोजन केलंय, याची माहिती देण्यात आलीय.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गत वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनानं यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे 31 जुलै 2024 पर्यंत पुरेल, अशा रीतीनं उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन केलंय. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी करु नये. असं असलं तरी, सर्वांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील आजघडीला उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत आज (7 मे) आढावा बैठक झाली. या बैठकीत पुढील दोन महिन्यात पाणीपुरवठ्याचे कशा पद्धतीनं नियोजन करायचे यावर चर्चा झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून आजघडीला 2 लाख 38 हजार 552 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा 16.48 टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून 1,37,000 दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 31 जुलैपर्यंत पाणी पुरेल, असं नियोजन प्रशासनानं केलंय.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा 106 टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत. एकूणच, हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज लक्षात घेवून, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेवून महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्यानं आढावा घेतला जातोय. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेवून आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

पालिका प्रशासनानं म्हटलंय की, पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी करण्याचं कारण नाही. असं असलं तरी, प्रशासनानं केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचे देखील सहकार्य लाभले पाहिजे. वैयक्तिक स्तरावर सर्व नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व व्यावसायिक आणि वाणिज्यिक आस्थापनांनी देखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे बदल स्वीकारावेत की ज्यातून पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीनं वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. देशाच्या आर्थिक राजधानीवर पाणी संकट; 'या' दिवशी गोरेगाव विभागाचा पाणीपुरवठा होणार 24 तासांसाठी बंद - BMC Water Supply
  2. आर्थिक राजधानीत 25 टक्के पाणी कपात नाही, बीएमसी प्रशासनानं काँग्रेसचे फेटाळले आरोप - Mumbai Water Cut
  3. Mumbai Water Supply Reduction: जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामामुळे 24 एप्रिल पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.