ETV Bharat / state

धरण उशाला, पण कोरड घशाला : 'सुखना' धरण आटल्यानं अनेक गावांची भिस्त टँकरवर - water scarcity problem - WATER SCARCITY PROBLEM

water scarcity problem : सुखना धरण आटल्यामुळं मराठवाड्यात पाणी टंचाईनं गावकरी त्रस्त आहेत. २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामळं गावकरी टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हा विभाग जवळपास १७५८ टँकरवर आपली तहान भागवत आहे.

dry sukhana dam
कोरडं पडलेलं सुखना धरण (ETV Bharat reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 12:21 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - water scarcity problem : मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. संभाजीनगर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेलं सुखना धरण पूर्णतः आटलं असल्यानं तीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. टँकरच्या पाण्यावर लोकांना अवलंबून राहावं लागत असल्यानं चांगला पाऊस होईपर्यंत पिण्याच्या आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता वाढली आहे. तर मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. धरणात असणारा पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी असताना त्याकडं दुर्लक्ष करत आवर्तन सोडल्यानं ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप गावातील लोकांनी केलाय.

सुखना धरण आटले: संभाजीनगर तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प असलेलं सुखना धरण सध्या कोरडं पडलं आहे. पात्र एखाद्या वाळवंटप्रमाने वाटू लागलंय. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ५४२.८२ मी इतकी साठवण क्षमता असलेलं धरण आज कोरडं पडल्यानं २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून उन्हाची तीव्रता अधिक झाल्यानं पाण्याचं बाष्पीभवन होत असून जमीन कोरडी पडत आहे. परिणामी धरण क्षेत्रात कोरड्या जमिनीला अक्षरशः भेगा पडल्या आहेत. एक एक फूट खोल भेगा पडल्यानं दुष्काळाची दाहकता तीव्र झाल्याचं दिसून येतं. याआधी २०१३ मधे पडलेल्या दुष्काळाच्या वेळी हा मध्यम प्रकल्प कोरडा पडला होता. त्यानंतर ११ वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली असून वाढीव टँकर बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

आवर्तन सोडल्यानं झाली अडचण: पाटबंधारे विभागानं धरणात असलेल्या पाण्याचं नियोजन केलं असतं तर नागरिकांना त्रास झाला नसता अशी माहिती गारखेडा गावातील ग्रामस्थांनी दिली. जानेवारी महिन्यात मुबलक पाणी असताना गावकऱ्यांचा विरोध असताना देखील आवर्तन सोडण्यात आलं, परिणामी एप्रिल महिन्यापासून पाणी आटल्याने धरण कोरडं पडलं. माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेना ते जनावरांसाठी पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थितीत केला. त्याचबरोबर परिसरात फळबागा अधिक असल्यानं उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहेच, शिवाय पाणी सोडल्यानं परिसरात मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांवर संकट कोसळलं आहे. अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चांगला पाऊस येई पर्यंत गावात राहायचं कसं असा प्रश्न गारखेडा येथील लोकांनी उपस्थितीत केलाय. त्यामुळे काही दिवसात स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील ९६१ गावांत पाणीटंचाई: मराठवाड्यातील अनेक गावांमधे टँकर सुरू करण्यात आले असून ही विभाग जवळपास १७५८ टँकरवर आपली तहान भागवत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टॅकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. विभागाचा आढावा घेतला असता, १४४ लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्णतः कोरडे झालेले आहेत. तर दुसरीकडे भूजल पातळी देखील कमालीची घटली आहे. गोदावरी पात्रातील पंधरा बंधाऱ्यांमध्ये १८% उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. तर सर्वात मोठं असलेलं जायकवाडी धरणान देखील तळ गाठायला सुरुवात केली असून केवळ ६% टक्के इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून पाणीटंचाई जाणवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

  1. ऐन उन्हाळ्यात तुमचं गाव टँकरमुक्त करायचंय? बीडमधील 'या' गावाचा घ्या आदर्श - Pitthi Tanker Free Village
  2. एकेकाळी भीषण पाणी टंचाई तर आता पाणीच पाणी, जाणून घ्या मेळघाटातील 'या' गावाची कहाणी - Amravati

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.