ETV Bharat / state

श्री संत तुकाराम महाराजांच्या टाळावरून टाळगाव चिखली गावाची ओळख, हजारो भाविक येतात दर्शनाला - Talgaon Chikhli History - TALGAON CHIKHLI HISTORY

Talgaon Chikhli History : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा चिखली गावाकडे प्रस्थान करत असताना त्यांनी वाजवलेले टाळ प्रसिद्ध आहेत. महाराज वैकुंठात जाण्याआधी त्यांनी हे टाळ गावात टाकले होते. या दगडी टाळामागचं रहस्य जाणून घेऊया.

Talgaon Chikhli History
तुकाराम महाराजांचे टाळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 4:53 PM IST

Updated : Jun 28, 2024, 5:23 PM IST

पुणे (चिखली) Talgaon Chikhli History : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज (28 जून) प्रस्थान होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. तुकाराम महाराज कीर्तन करताना उत्तमरीत्या टाळ वाजवायचे. देहू पंचक्रोषीतील 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी पिंपरी-चिंचवड जवळील चिखली गावातील होते. वैकुंठगमनाआधी तुकाराम महाराजांनी आपले टाळ या गावात टाकले होते. तेच हे दगडाचे टाळ असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

संत तुकाराम महाराजांच्या टाळांचं महत्त्व सांगताना वारकरी (ETV Bharat Reporter)

असे पडले टाळगाव चिखली नाव : भाविक मोठ्या श्रध्देने देहू-आळंदी बरोबरच टाळगाव चिखलीत जाऊन दगडाच्या टाळचं दर्शन घेतात. हे दगडाचे टाळ इथे कसे आले? या मंदिराचा काय इतिहास आहे? त्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान देहू-आळंदी. त्यांच्या मधोमध चिखली गाव वसले आहे. संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठाला जाताना आपले टाळ चिखली गावात टाकले होते. त्यावरूनच गावाला ‘टाळगाव चिखली’ असे संबोधले जात आहे. त्या घटनेचे साक्षीदार असलेले टाळ मंदिर आजही गावात आहे. तसंच महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी निष्ठावंत टाळकरी मल्हारपंत कुलकर्णी त्यापैकी एक होते.

तुकारामांकडून दगडी टाळ मल्हारपंतांना भेट : पंचमीच्या दिवशी मल्हारपंत कुलकर्णी यांना टाळरुपी हा प्रसाद मिळालेला आहे. या गावातील पुरातन दत्त मंदिरात मल्हारपंत कुलकर्णी अभंग गात टाळ वाजवत असत. श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन होत असताना प्रसाद रुपी एक दगडी टाळ मल्हारपंत यांना दिला. तो टाळ आजही चिखली गावात अस्तित्वात असून तेथील ग्रामस्थांची आचार-विचार, उन्नती, फक्त भक्ती पारायणामुळेच आहे. आमच्या गावात प्रत्येक घरामध्ये प्रवचन आणि कीर्तन करणारे व्यक्तिमत्त्व आढळून येईल, असं ग्रामस्थ प्रमुख मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. धनगर समाज आरक्षण : देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; समिती करणार छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा दौरा - Dhangar Reservation
  2. दिल्लीत मुसळधार पाऊस; IGI विमानतळाचं छत कोसळलं; एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर - Roof Collapsed at Delhi Airport
  3. नीट पेपर लिक प्रकरण : विरोधकांचा नीटवरुन लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक - Lok Sabha Session 2024

Last Updated : Jun 28, 2024, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.