ETV Bharat / state

कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकमुळं मतदान प्रक्रियेला लागला ब्रेक, साताऱ्यातील घटनेनं खळबळ - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एका वेगळ्याच कारणानं तासभर मतदान प्रक्रिया थांबल्यानं अनेक मतदारांना भर दुपारी ताटकळावं लागलं. तसंच ताटकळून काही मतदार मतदान न करताच घरी गेल्याचा प्रकार पाटण विधानसभा मतदार संघात घडलाय.

Voting was closed for an hour in Patan Assembly Constituency a shocking reason came to light
पाटण विधानसभा मतदारसंघ (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 10:45 PM IST

साताऱ्यातील सुपने गावात तासभर मतदान बंद (reporter)

सातारा Lok Sabha Election 2024 : मतदान यंत्रात बिघाड होवून मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना यापूर्वी आपण अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. परंतु, लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच कारणानं तासभर मतदान प्रक्रिया थांबल्यानं अनेक मतदारांना भर दुपारी ताटकळावं लागलं. इतकंच नाही तर यामुळं काही मतदार मतदान न करताच घरी परतले. मंगळवारी (7 मे) दुपारी 1 ते 2 च्या वाजेच्या सुमारास पाटण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सुपने गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

नेमकं काय आहे प्रकरण? : पाटण विधानसभा मतदार संघातील सुपने या गावात तरूणांनी कुटुंबातील मतदारांना दुपारी मतदान केंद्रावर आणले होते. मात्र, यावेळी मतदान प्रक्रिया बंद असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तर कशामुळं मतदान थांबलय, याची ग्रामस्थांनी माहिती घेतली असता कोणतीही तांत्रिक अडचणीमुळं नव्हे, तर जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टी केल्यानं मतदान प्रक्रिया थांबल्याचं धक्कादायक कारण समोर आलं.

तलाठ्यानं दिला दम : मतदान प्रक्रिया बंद असल्याचं आपण तहसीलदारांना कळवलं. त्यांनी तलाठ्याला खात्री करण्यास सांगितलं. मात्र, खात्री करण्याऐवजी तलाठ्यानं आपल्यालाच दमात घेतल्याचा आरोप, धनाजी पाटील या ग्रामस्थांनी यावेळी केला. तसेच मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांचं म्हणणं काय? : या संदर्भात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीनं झोनल अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याशी संपर्क साधला असता 'तसं काही झालं असेल तर आपण मतदारांना थोडा आणखी वेळ देवू. पण, विषय सोडून द्या', अशी विनंती त्यांनी केली. नंतर महिला मंडल अधिकारी थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, 'असा प्रकार होणं शक्य नाही. मतदान कर्मचारी नव्हे तर अंगणवाडी कर्मचारी जेवायला बसले होते', अशी सारवासारव त्यांनी केली.

हेही वाचा -

  1. 'अब की बार, 400 पार'चा नारा पूर्ण होणारच, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास - MP Dhananjay Mahadik Claims
  2. लोकसभा निवडणूक 2024: कोल्हापुरात मातब्बरांची लढत; छत्रपती घराण्यासह महाडिक कुटुंबानं बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 मतदान; नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये सामना; नारायण राणेंनी केलं 'हे' आवाहन - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.