मुंबई Lok Sabha Election 2024 : तुमचं नाव मतदार यादीत असेल तरच तुम्ही मतदान करू शकता. मतदारांना मतदान केंद्रावर जाण्याआगोदर, निवडणूक लढवणारे उमेदवार, निवडणुकीच्या तारखा आणि वेळ, ओळखपत्र, मतदान केंद्राची माहिती मतदारांनी तपासून घ्यावी. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकींचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. विविध राजकीय पक्षांनी मतदाराना आकर्षित करण्यासाठी चिन्हाचं कॅम्पेन सुरू केलं आहे. मात्र, मतदान करताना मतदारांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
मतदार यादी : भारतात जन्मलेल्या प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, मतदारांना विविध आमिष दाखवण्याचं काम राजकीय पक्षाकडून होतं. त्यामुळं तुम्ही जागृक मतदार म्हणून मतदान करण्याची गरज आहे. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर Voters Service Portal वर जायचं आहे किंवा तुम्ही electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. या सरकारी वेबसाईटवर तुम्हाला Voters लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. पहिल्या ऑप्शन हा आहे की, आपण आपले डिटेल्स टाकून व्होटर लिस्टमध्ये नाव चेक करू शकता. तिथं सर्व माहिती भरून तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कळू शकतं.
मतदार नोंदणी कुठं तपासायची? : तुमचं नाव मतदार यादीत असेल तरच तुम्ही मतदान करू शकता. यादीतील तुमचं नाव मतदानाला जाण्याआधी तपासून पाहावं. त्यानंतरच मतदान केंद्रावर मतदारांनी जावं. त्यामुळं मतदार यादीत तुमचं नाव पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी.
मतदार यादीत नाव कसं शोधायचं? : निवडणुकीदरम्यान सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. पण तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासायला हवं. प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अपडेट केल्या जातात. मतदार यादीतील नावं जाणून घेण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in वर लॉग इन करा. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत तपासून पाहा.
मतदान कसं करायचं?
- मतदान करण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्षे असणं आवश्यक आहे. तुमची मतदार म्हणून नोंदणी झाल्यानंतर तुम्ही मतदान केंद्रावर जाऊ शकता.
- मतदान केंद्रात गेल्यावर, तुम्हाला रांगेत मतदान करण्यासाठी जावं लागेल. तुमचा नंबर आल्यावर, मतदान अधिकारी तुमचं मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुकच्या आधारे तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतील. यातील कोणतंही एकच कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे.
- तुमच्या ओळखपत्राची खात्री झाल्यानंतर तुमच्या बोटाला निवडणूक अधिकारी शाई लावतील. ही शाई तुम्हाला पुसता येणार नाही.
- त्यानंतर, तुम्हाला मतदार रजिस्टरमध्ये सही करावी लागेल. यानंतर, दुसरा मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी असलेली मतदार स्लिप देईल. त्यानंतर अधिकारी तुम्हाला मतदान करण्यासाठी विशिष्ट एक टेबलवर ठेवलेल्या बॉक्सकडं जायला सांगतील. तिथं गेल्यावर EVM मशीनवर असलेल्या सर्व उमेदवारांच्या नावांचं प्रथम निरीक्षण करावं, तिथं ईव्हीएम मशीनच्या बाजूलाच तुम्हाला बॅलेटिंग युनिट दिसेल, तिथं तुमचं मत नोंदवलं जाईल.
- EVM मशीनवर तुम्हाला उमेदवारांच्या नावांसह त्यांचं निवडणूक चिन्ह दिसेल. त्याच्या बाजूलाच एक बटण असेल, ज्या मतदारांना वाचता येत नाही अशांसाठी प्रत्येक उमेदवारापुढं त्याचं निवडणूक चिन्हं (चिन्हाचा फोटो) असतं. त्या चिन्हाचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करावं.
- त्यानंतर मतदारांनी आवडत्या उमेदवारांच्या नावासमोरील निळ्या रंगाचं बटण दाबावं. हे बटण तुम्ही काही सेकंद दाबून ठेवावं. त्यानंतर EVM मशीनवर तुम्हाला बीप ऐकायला येईल, त्यावेळी तुमचं मतदान यशस्वी झालं असं समजावं.
हेही वाचा -
- "1999 पासूनच उद्धव ठाकरे...", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis
- "हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी...", चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हानं - Chandrashekhar Bawankule
- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान; महाराष्ट्रातील 'या' 11 मतदारसंघांत होणार चुरशीची लढत - Lok Sabha Elections 4th Phase