मालेगाव (नाशिक) Yogi Adityanath In Malegaon : आज धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मालेगाव येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी धुळे येथील एकविरा मातेला अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली. तसंच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म झाल्यामुळे राज्य पवित्र आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र पवित्र असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. जेव्हा औरंगजेब हिंदूंवर कर लावत होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असं ते म्हणाले.
पूर्वी दंगली व्हायच्या, आता होत नाहीत : योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राममंदिर धुणार असे म्हणतात. मात्र यूपी तुम्हाला निवडून देणार नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अयोध्येला जातो. काँग्रेसला माहिती नाही हा नवा भारत आहे. हा बोलत नाही करून दाखवतो. हा नवीन भारत आहे. छेडत नाही पण छेडलं तर सोडत पण नाही. काँग्रेसचं सरकार आल्यावर राममंदिर धुणार; पण रामलल्ला यांना त्या लायक ठेवणार नाही. संपूर्ण भारतात एकच नारा 'फिर एक बार मोदी सरकार' सुरू आहे. विरोधी पक्ष विचारतात तेव्हा जनता उत्तर देते. 'जो राम को लाये है हम उनको लायेंगे.' यामुळे सर्वांना रामलल्लाचे दर्शन करण्याचे निमंत्रण देतो. मतदान आमच्यासाठी गरिबांना न्याय देण्याचा आणि भारताला विकसित भारत करण्याचा मार्ग आहे; मात्र त्यांच्यासाठी निवडणूक लुटण्याचा मार्ग आहे. प्रगतीचा संकल्प घेऊनच आम्ही 10 वर्षांपासून काम करतोय. 2014 आधी काय परिस्थिती होती. आता काय आहे सिमेवर कोणाची घुसखोरी करण्याची हिंमत नाही. पूर्वी दंगली होत होत्या. आता त्या होत नाहीत. आता फटाका जरी वाजला तरी पाकिस्तान सफाई देते. यात आमचा हात नाही. जे पाकिस्तानचे समर्थन करतात त्यांना पाकिस्तानला पाठवा आणि त्यांना तिथे जाऊन भीक मागू द्या. जेवढी पाकिस्तानची लोकसंख्या आहे तेवढे आम्ही वर पाठवले.
काँग्रेसचे घोषणापत्र मुस्लिम लीगचे घोषणापत्र : काँग्रेस काळात सिलिंडर मिळत नव्हते. मोदींनी 10 करोड सिलिंडर दिले आहेत. गरीब कल्याण योजना सुरू आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी आघाडी घेतली. सध्या महात्मा गांधीजींची काँग्रेस राहिली नाही. सध्याची काँग्रेस सोनिया-राहुल काँग्रेस झाली आहे. काँग्रेसचे घोषणापत्र मुस्लिम लीगचे घोषणापत्र आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण काढून मुस्लिमांना देणार आहेत. युपीएच्या काळात जस्टीस रंगनाथन आयोगाने मुस्लिमांना सहा टक्के आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. सच्चर आयोगाद्वारे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट रचत काँग्रेसचे शहजादे झटक्यात गरिबी काढण्याची भाषा करतात. काँग्रेस सत्तेत आल्यावर तुमची प्रॉपर्टी घेऊन मुस्लिम लोकांना वाटेल. औरंगजेबचा जिझिया कर लागू करण्याचा प्रयत्न करतील, असंही योगी आदित्यनाथ यांनी आवर्जून सांगितलं.
भाजपाला विकसित भारत बनवायचा आहे : काँग्रेस आणि मित्रपक्ष सारखेच आहेत त्यांना पाडा. मुंबई ब्लास्ट मधील आरोपी मुसा विरोधकाचा प्रचार करत आहेत भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षच भारताला सुरक्षित ठेऊ शकतात. उत्तर प्रदेशात भोंगे काढून टाकले. रस्त्यावर नमाज होत नाही. काँग्रेसने आणि समाजवादी पार्टीने पाळलेले गुंड संपवले. मालेगाव आणि धुळ्यात गोहत्या करू द्याल का? राममंदिराचे श्रेय आपल्याला आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्लॉटर हाऊस बंद केले. विकसित भारत बनवायचा आहे. येथे बेटी आणि व्यापारी सगळे सुरक्षित राहतील असा भारत बनवायचा आहे. सुभाष भामरे यांना निवडून द्या आणि सगळे रामाच्या दर्शनासाठी या. विजय निश्चित आहे. मी ऐतिहासिक विजयांसाठी आलो आहे. निवडणुकीच्या दिवशी कमळच कमळ दिसले पाहिजे, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं. यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री दादा भुसे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, उमेदवार सुभाष भामरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :