ETV Bharat / state

महाबळेश्वरातील विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनानं फिरवला बुलडोझर, 15 खोल्या जमीनदोस्त - Vishal Agarwal - VISHAL AGARWAL

Vishal Agarwal : सातारा जिल्हा प्रशासनानं शनिवारी सकाळी महाबळेश्वरात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील वादग्रस्त बिल्डर विशाल अग्रवालच्या पंचतारांकित एमपीजी क्लबच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवत सुमारे 15 खोल्यांचं बांधकाम जमीनदोस्त केलय.

Vishal Agarwal
विशाल आग्रवाल यांच्या हॉटेलवर कारवाई (Reporter ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 3:27 PM IST

सातारा Vishal Agarwal : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दारूच्या नशेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिलाय. अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत 15 खोल्या जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईमुळं महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे.

प्रशासनानं हॉटेल केलं होतं सील : महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं अनधिकृत हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानं सील केलं होतं. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनानं हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. सकाळी दहापर्यंत प्रशासनानं हॉटेलच्या अनधिकृत १५ खोल्यांचं बांधकाम तोडकामाची कारवाई पूर्ण केली. यावेळी प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश : बिल्डर विशाल अग्रवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनानं तपासणी केली असता हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर हॉटेल, बार आणि अनाधिकृत बांधकाम प्रकरणी संपूर्ण हॉटेलच सील करण्यात आलं होतं. आज अनाधिकृत बांधकामही पाडण्यात आलं.

हॉटेलच्या बारचा परवाना रद्द : एमपीजी क्लबमधील बार हा बिल्डर विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार यांच्या नावे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं या हॉटेलवर धाड टाकत बारचा परवाना रद्द केला आहे. तसंच या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं बार देखील सील करण्यात आला होता.

भाडेपट्ट्यावरील जागेचा उद्योगासाठी वापर : लीजवरील एमपीजी क्लबच्या जागेचा उद्योगाच्या कारणासाठी वापर होत असल्याचं आढळून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. या क्लबला काही दिवसांपूर्वी प्रशासनानं टाळं ठोकलं होतं. तसंच अनधिकृत असलेल्या 15 खोल्या जमीनदोस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर शनिवारी सकाळी प्रशासनानं अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला.

हे वाचलंत का :

  1. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबांवर आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? - Pune Porsche car accident
  2. सुनील टिंगरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे; पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून पाठराखण - Pune Porsche Accident
  3. डॉ. अजय तावरेला भर चौकात फाशी द्या; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी - Pune Hit and Run Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.