ETV Bharat / state

विरार चंदनसार येथील पेट्रोल पंप मालकाची हत्या, आरोपी फरार - Virar murder case - VIRAR MURDER CASE

Virar murder case : विरारच्या चंदनसार येथील पेट्रोल पंपच्या मालकाचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. सोमवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या चालकानं ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Virar murder case
पेट्रोल पंप मालकाची हत्या (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 10:44 PM IST

विरार Virar murder case : विरारमध्ये पेट्रोल पंप मालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंप मालक रामचंद्र काकरानी (वय 75) यांची हत्या झाली आहे. सोमवारी त्यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला.

पेट्रोल पंप मालकाची हत्या (Source - ETV Bharat Reporter)

नेमंक प्रकरण काय ? : याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी नेहमीप्रमाणे रामचंद्र काकराणी आपल्या खाजगी कारमधुन चालकासोबत विरार येथील पेट्रोल पंपावर आले होते. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ते व्यवस्थापकाकडून 50 हजार रुपये घेऊन घरी येण्यासाठी निघाले. रात्री घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांची वाटेतच हत्या केली. मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ सोडून पळ काढला.

  • सोमवारी दुपारी स्थानिक नागरिकांना कारमध्ये बांधलेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता गळा आवळून त्यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. पोलीस अधिक तपास केला जात आहे.

चालकावर संशय : रविवारी रात्री रामचंद्र काकरानी यांचा मोबाईल नायगाव पोलीस ठाणे हद्दीत नागले गावात आढळून आला. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय आल्यानं कुटुंबियांनी नायगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. आज दुपारी त्यांचा मृतदेह महामार्ग शेजारी त्यांच्याच कारमध्ये आढळून आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरिक्षक रमेश भामे यांनी दिली. या हत्येप्रकरणी काकरानी यांच्या चालकावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा

  1. वर्षा सहल जीवावर बेतली! शहापूरजवळील ओढ्यात बुडून जिम ट्रेनरचा मृत्यू - Gym Trainer Died
  2. "...तर कंगणानं आमच्या गावात 'चाय पे चर्चा' करिता यावं," शेतकरी नेत्यांची उपरोधिक टीका - kangana ranaut News
  3. दिशा सालीयन प्रकरण चिघळलं; आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपा आणि उबाठा गटात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज - Dispute Raised Between BJP And UBT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.