ETV Bharat / state

पै-पै जमवून उभा केलेला संसार क्षणात उध्वस्त : थरारक अनुभव सांगताना महिलेला अश्रू अनावर - Vishalgad violence

Vishalgad violence : रविवारी विशालगड परिसरात झालेल्या हिंसाचारामुळं जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी विशालगडला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महिलांनी एकच आक्रोश केल्याचं दिसून आलं.

Vishalgad violence
वहिदा गडकरी (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 10:06 PM IST

कोल्हापूर Vishalgad violence : खासदार शाहू महाराजांनी आज विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना विविध वस्तूंच वाटप देखील केलं. यावेळी अनेक महिलांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी घडलेली सर्व हकीकह आज महाराजांना सांगितली. यावेळी काही महिलांनी घडलेल्या घटनेचा थरारक अनुभव सांगितला. विशाळगडावर रविवारी अतिक्रमण मुक्त मोहिमेला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या गावात जमावानं केलेल्या नुकसानीत घराची राख-रांगोळी झालेल्या नुकसानग्रस्त महिलेला हा अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले.

वहिदा गडकरी यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

"40 वर्ष आजी-आजोबांपासून आम्ही इथंच राहतो. ऐतिहासिक विशाळगडाला जाणाऱ्या वाटसरूंना अनेकदा आम्हीच आधार दिला आहे. मात्र रविवारची सकाळ आमच्यासाठी काळरात्र बनून आली. हातात काट्या, घोषणाबाजी करत आलेल्या जमावानं आमच्या राहत्या घरावर दगडफेक केली. यामुळं आम्ही भयभीत झालो. वाट मिळेल त्या दिशेनं जंगलाकडं जीवाच्या आकांतानं पळत निघालो, मात्र पै-पै जमवून उभा केलेला संसार क्षणात होत्याचा नव्हता झाला". - वहिदा गडकरी

संसार झाला उध्वस्त : विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात वहिदा गडकरी एकट्याच आपल्या घरी राहतात. त्यांचा मुलगा, पती कामानिमित्तानं बाहेरगावी असल्यानं गावातच छोटं-मोठं काम करून वहिदा आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी विशाळगडाच्या पायथ्याशी तरुणांचे जथ्थेच्या जथे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विशाळगडाकडे निघाले. दरवर्षीचं पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेसाठी अनेक शिवभक्त चालत जातात, ही गेली 40 वर्षे डोळ्यांना असलेल्या सवयीमुळं हे आपलेच लोक आहेत. यांच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही, असाच समज वहिदा यांचा झाला. मात्र, रविवारची सकाळ उजडली. धो-धो पावसात जमाव आपल्याच वस्तीतील घरांवर चाल करून येत असल्याचं पाहून राहत्या घराला कुलूप लावतं वहिदा जवळच्या नातेवाईकांकडं गेल्या. मात्र, आक्रमक जमावानं या महिलेचं राहतं घर अक्षरश:उध्वस्त केलं.

आमचा दोष काय : घराची कौलं, दरवाजे खिडक्या घरातील प्रापंचिक साहित्य, पावसाळ्यासाठी धान्याची ठेवलेली साठवणूक अक्षरशः घराबाहेर आणून उद्धवस्त केलं. क्षणात पै-पै जमवून उभारलेल्या संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. जमाव पांगल्यानंतर जंगलाचा आश्रय घेऊन जीव वाचलेल्या वहिदा यांनी गावात धाव घेतली. घराची दुरास्था पाहूण त्यांनी एकच हंबरडा फोडला. माझ्या घरापासून विशाळगडाचं अतिक्रमण पाच किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही वाडवडिलांपासून याच गावात स्थायिक आहे. आमचं कुठलंही अतिक्रमण नाही, तरीही आमच्या संसाराची राख रांगोळी झाली. आमचा दोष काय, आम्ही जगायचं कसं? असा सवाल या महिलेनं उपस्थित केला.

'हे' वाचलंत का :

  1. विशाळगडावर तणावपूर्ण शांतता; शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना दिला आधार - Vishalgad Violence Case
  2. विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case
  3. विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.