ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विजय चौगुले यांचं उपोषण स्थगित - Chaugule hunger strike suspended - CHAUGULE HUNGER STRIKE SUSPENDED

Vijay Chougule hunger strike suspended: झोपडपट्टी सर्वेक्षणावरून भाजपा आमदारांविरोधात शिवसेनेच्या नेत्यानं पुकारलेले उपोषण अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलं आहे.

Vijay Chaugule
विजय चौगुले (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 7:15 PM IST

नवी मुंबई Vijay Chougule hunger strike suspended : शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी उपोषण मागं घेतलं आहे. नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. "माझं उपोषण सरकारच्या विरोधात नसून हे उपोषण स्थानिक आमदाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करत सोमवारपासून नवी मुंबईतील झोपडपट्टीचं सर्वेक्षण केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं.

नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter)

काय आहे प्रकरण : एसआरए सर्वेक्षणावरून नवी मुंबईत महायुतीत वाद सुरू होता. ऐरोली मतदारसंघाचे नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक विरुद्ध शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यात झोपडपट्टी सर्वेक्षणावरून चांगलीच खडाजंगी झाली. एसआरए सर्वेक्षण रोखण्यासाठी गणेश नाईक यांनी राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप करत विजय चौगुले यांनी केला होता. त्यामुळं बायोमेट्रिक सर्वेक्षण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमचा लढा सरकारविरुद्ध नाही, आमचा लढा येथील ऐरोली मतदारसंघातील आमदारांविरुद्ध आहे, असंही ते म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागं : यावेळी बोलताना खासदार नरेश मस्के म्हणाले की, विजय चौगुले झोपडपट्टीवासीयांना हक्काचं घर मिळावं, यासाठी उपोषणाला बसले होते. एसआरएची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतेय. मात्र, नवी मुंबईत झोपडपट्टी सर्वेक्षण बंद झाल्यानं त्याविरोधात ते उपोषण करत होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मला या ठिकाणी पाठवलं. एसआरए अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मुख्य सचिव उपोषणस्थळी आले होते.

व्यापारी वर्गाचे उपोषणाला समर्थन : विजय चौगुले यांच्या उपोषणाचा आज शनिवारी तिसरा दिवस होता. त्यामुळं त्यांची प्रकृतीही चिंताजनक बनली होती. त्यामुळं चौगुले यांनी उपचार घ्यावे, असं डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांनी उपचाराला नकार दिला होता. चौगुले यांच्या उपोषणाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यानं संपूर्ण दिघा, ऐरोली आणि रबाळेत बंद पाळण्यात आला होता.

हे वाचलंत का :

  1. "निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून गुंडांचा वापर...", संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Sanjay Raut On Devendra Fadnavis
  2. का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
  3. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.