ETV Bharat / state

"सरकार मराठा...."; आरक्षण प्रश्नावरुन अंबादास दानवेंचा गंभीर आरोप - Ambadas Danve - AMBADAS DANVE

Ambadas Danve : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वाद पेटललाय. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.

ambadas danve
अंबादास दानवे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 6:37 PM IST

Updated : Jun 22, 2024, 6:58 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : सरकार ओबीसी आणि मराठा या दोघांनाही फसवतेय, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तसंच मनोज जरांगे यांनी मागणी केल्यावर देखील सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं मराठा समाजाला न्याय मिळू शकलेला नाही. जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पाच नातेवाईकांचे प्रमाणपत्र सादर केल्यावर एखाद्याला जात प्रमाणपत्र मिळतं, त्यात काही नवीन नाही. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे असाही आरोप अंबादास दानवेंनी केलाय.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

अशानं राज्य अधोगतीला जाईल : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होतोय. त्यात राजकीय नेत्यांनी आपली भाषा सांभाळून वापरली पाहिजे. लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हिंसा, गावबंदी करणं हे चुकीचं आहे. राजकीय नेत्यांनी जातीय द्वेष होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. असं केल्यास जनमत आंदोलकांच्या विरोधात जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे. राज्यात सरकारच आंदोलन पेटवत आहे. मराठा समाजाचं आंदोलन केलं, नंतर ओबीसी समाज आंदोलन करतात. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या विचारांचा आहे. इथं असा जातिवाद माजला तर राज्य अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्य घेतात, आपणच असं वागलो तर कसं होईल असं देखील त्यांनी सांगितलं.

गोपीनाथ मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडे भूमिका घेतील का? : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समाज माध्यमांवर ओबीसी आंदोलनाचं कौतुक केलं. वडीगोड्री इथं सुरु असलेलं आंदोलन कौतुकास्पद आहे, असं त्यांनी म्हटलं, त्यावर राजकीय नेत्यांनी समाज माध्यमांवर बोलताना जपून बोलावं. स्व गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेत होते, त्याप्रमाणे पंकजा मुंडे भूमिका घेतीलं का अशी शंका आहे. त्यांना लोकसभेत त्याचे परिणाम भोगायला भेटले, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

आधी कारवाई करा नंतर कायदा लागू करावा : यावेळी नीट पेपरफुटीवर त्यांनी भाष्य केलं. ज्यांनी 'नीट'चे पेपर फोडले, त्यांना आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि नंतर कायदा लागू करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. 'नीट'सारख्या परीक्षांमध्ये जर पेपर फुटत असतील तर तलाठी आणि अन्य परीक्षांमध्ये काय होईल असा प्रश्न आहे. त्यामुळं आधी ज्यांनी पेपर फुटले त्यांच्यावर कारवाई करा आणि नंतर कायदे लागू करा अशी मागणी दानवे यांनी केली.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण अखेर मागे, मंत्री छगन भुजबळांसह शिष्टमंडळानं घेतली भेट - Chhagan Bhujbal
  2. 'ओबीसी आंदोलन सरकारसोबत मॅनेज; आमच्या नोंदी रद्द केल्या तर महागात पडेल', मनोज जरांगे यांचा इशारा - Maratha Reservation

Last Updated : Jun 22, 2024, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.