मुंबई Sangeet Natak Akademi Award : अतिशय मानाचा असलेला संगीत नाटक अकादमीचा नाटक विभागातील अभिनयासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. नुकताच अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यापाठोपाठ त्यांना आणखी एक बहुमान मिळतोय. याबाबत ईटीव्ही भारतचे संपादक सचिन परब यांनी अशोक सराफ यांच्याशी 'एक्स्लुसिव्ह' बातचीत केली. 'संगीत नाट्य अकादमी पुरस्कार' जाहीर झाल्यानं ऊर्जा मिळाली. यापुढं अधिक वेगळं काही करावं, अशी इच्छा आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
या कलावंतांना करण्यात आलं सन्मानित : नवी दिल्लीच्या नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक, डान्स आणि म्युझिक यांच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी अभिनयाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी व्होकल गायकीसाठी संगीत क्षेत्रातील पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला. अभिनयासाठी देण्यात येणारा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कारानं ऊर्जा मिळाली, मात्र आणखी बरंच काही करायचं : 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार मिळाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचा नुकताच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. एकाच वर्षी त्यांना दोन महत्वाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे संपादक सचिन परब यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला. पाच दशकांहून अधिक काळ नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांमधून विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्यानंतरही आपल्याकडून बऱ्याच आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारणं बाकी आहे, अशी प्रतिक्रिया देत अशोक सराफ यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही आपल्यातला कलाकार तरुण असल्याची साक्ष पटवून दिली. यावर अधिक बोलताना त्यांनी, "मला संगीत नाट्य़ अकादमी पुरस्कार मिळाल्यानं आनंद झाला. यापेक्षा अगोदर मिळाला नाही, याबाबत वाईट वाटत नाही. हा बहुमान मिळायला अधिक विलंब झाला असता तर कदाचित वेगळ्या भावना असत्या. तो आता मिळाला याचा आनंद आहे. संगीत नाट्य अकादमीच्या पुरस्काराने मिळाल्यानं ऊर्जा मिळाली. यापुढं काही वेगळं करावं, चांगलं करावं, असं वाटतं. अद्यापही बरंच काही राहून गेलं आहे. सगळीच कॅरेक्टर सारखीच नसतात, त्यामुळं ती करायची राहून जातात. आणखी काही वेगळं मिळालं, तर नक्की करू," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :