मुंबई Vasudhaiva Kutumbakam Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानने 'विश्वशांती दत्त-वसुधैव कुटुंबकम' हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. मोदींचा 'वसुधैव कुटुंबकम' या तत्त्वावर विश्वास आहे, म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे. विश्वाला एक मानण्याची त्यांची अभिव्यक्ती विलक्षण आहे. त्यांची अभिव्यक्ती दैवी स्वर आणि काव्यात्मक श्लोकांमधून मांडली गेली. वसुधैव कुटुंबकम सर्व देशांच्या सीमा ओलांडून शांततेच्या मार्गावर सर्व राष्ट्रे आणि नागरिकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.
जागतिक एकतेचा संदेश: कवी डॉ. दीपक वझे यांचे स्फुरण देणारे शब्द आणि पद्मश्री शंकर महादेवन आणि निसर्ग पाटील यांचे स्वर्गीय आवाज या स्वरांजलीच्या निमित्तानं एकत्र आले. या सगळ्यांनी एकत्रितपणे जागतिक एकतेचा संदेश जगाला दिला आहे. राष्ट्रांमध्ये शांतता आणि एकता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी वचनबद्ध आहेत. हा या उत्सवाचा आत्मा आहे. जगात भविष्यात सर्व मानव एकसंध राहावेत. विभाजनांपासून मुक्त व्हावेत यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, 'वसुधैव कुटुंबकम विश्वशांती दूत मैफिली'चं आयोजन करण्यात आलं होतं. जो एका मैफिलीपेक्षाही खूप मोठा उपक्रम आहे.
यांनी या उपक्रमाला 'चार चांद' लावले : संगीत सर्व समस्यांवरील उपाय आहे आणि जग एकत्र आणण्यासाठीही संगीताचा वापर केला जाऊ शकतो, हे या उपक्रमातून समोर आणण्यात आलं. आदिनाथ मंगेशकर आणि निसर्ग पाटील यांचे सहकार्य, रूपकुमार राठोड यांचे संगीत, डॉ. दीपक वझे यांची काव्य प्रतिभा आणि पद्मश्री शंकर महादेवन आणि निसर्ग पाटील यांचे गायन यांनी या उपक्रमाला 'चार चांद' लावले. या उपक्रमाला भाजपा नेते आशिष शेलार आणि हितेश जैन यांनी पाठिंबा दिला. हा संगीतमय महोत्सव म्हणजे जगात शांततेची किती आवश्यकता आहे ते अधोरेखित करणारा आहे. ज्या व्यक्तीने संपूर्ण जगाला एकत्र आणण्यासाठी आपलं जीवन झोकून दिलं त्या व्यक्तीचा म्हणजे पंतप्रधान मोदींचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे.
हेही वाचा -
दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी निमित्त 'प्रेरणा फाउंडेशन'ला लता दिदींची आर्थिक मदत