ETV Bharat / state

Vasant More Resigns मनसे नेते वसंत मोरे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, राजीनाम्याचं हे' सांगितलं कारण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 2:27 PM IST

Vasant More Resigns गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील गटबाजीचे चित्र चव्हाट्यावर येत आहे. त्यातच मनसेचे नेते वसंत मोरे हे सातत्यानं नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत मनसेला 'जय महाराष्ट्र' केलं आहे.

Vasant More Resigns
Vasant More Resigns

पुणे Vasant More Resigns - गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे पक्षातील पदाधिकारी यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांनी एक्स मीडियात पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आहे. त्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामादेखील दिला.

वसंत मोरे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलं की, "पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचं पालन करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत आलो आहे. गेली 18 वर्षे पक्ष संघटना वाढीसाठी सातत्यानं काम करत आलो. पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे."

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी'- पुढे पत्रात म्हटले की," भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो. त्यांना ताकद देतो. सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिलं जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती."

वसंत मोरे यांनी का दिला राजीनामा? वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो." त्यानंतर त्यांनी आज थेट राजीनामा दिला. माध्यमांशी बोलताना मनसे नेते मोरे म्हणाले, " पुण्यात लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. मात्र, कोअर कमिटीतील काही सदस्य माझ्याविरोधात होते.

हेही वाचा-

"पुणे लोकसभेसाठी पक्षाकडून माझाच क्लेम", मनसे नेते वसंत मोरे यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.