ETV Bharat / state

56 हजार मतदानांची लीड तोडत वर्षा गायकवाड यांचा झंझावती विजय - Lok Sabha Election Result 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:53 PM IST

Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर मध्य लोकसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातील मतमोजणी आता पूर्ण झाली असून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. गायकवाड यांच्या विरोधात भाजपान प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटपर्यंत चाललेल्या रोमहर्षक लढतीत वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम यांचा पराभव केलाय

Lok Sabha Election Result 2024
वर्षा गायकवाड (ETV BHARAT MH Desk)

मुंबई Lok Sabha Election Result 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात चांगली कामगिरी केलीय. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा पैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वात चुरशीची ठरली. या मतदारसंघातील मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड आणि भाजपाचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. मतमोजणीदरम्यान या दोन उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली.

56 हजार मतांची आघाडी घेत विजय : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. येथे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीनं, तर वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती. या जागेसाठी सुरुवातीपासूनच दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. उत्तर मध्य मुंबईत मतमोजणी सुरू असताना वर्षा गायकवाड काही काळ आघाडीवर होत्या. मात्र, त्यानंतर भाजपाचे उज्ज्वल निकम यांनी कमालीची आघाडी घेतली होती. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांनी 56 हजारांची लीड घेतली होती. त्यामुळं वर्षा गायकवाड यांचा पराभव होणार असल्याची चर्चा होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी जोरदार मुसंडी मारत निकम यांचा 56 हजार मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईतील लोकसभेची जागा काँग्रेसनं अनेक वर्षांनी जिंकली आहे.

महाविकास आघाडीचे मुंबईत 5 खासदार : पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांची आघाडी 56 हजारांवरून प्रथम दीड हजार आणि नंतर 700 मतांवर आली. शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. त्यामुळं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांच्या विजयानं मुंबईतील महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

हे वाचलंत का :

  1. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी, अमोल कीर्तिकरांचा आधी विजय नंतर पराभव - Lok Sabha Election Results
  2. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का, नीलेश लंकेंचा विजय, विखेंचा पराभव - Ahmednagar Election 2024 Result
  3. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी; विजयानंतर दिली पहिली प्रतिक्रिया - Pune Loksabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.