छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Afsar Khan Candidacy : एमआयएम पक्षाला पाठिंबा देण्यासाठी वंचिततर्फे अधिकृत उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला नसल्याने, राजकीय चर्चांना उधाण आले होते; मात्र त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. यावर बोलताना वंचितने कोणालाही पाठिंबा मागितला नव्हता; मात्र मतांच्या गरजेपोटी त्यांनी स्वतःहून तो पाठिंबा जाहीर केला, अशी टीका अफसर खान यांनी केली.
अफसर खान यांना ऐनवेळी एबी फॉर्म : 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे नवीन राजकीय समीकरण समोर आले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचितच्या मतांमुळे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वंचितला एमआयएम पक्षाकडून साथ मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या युतीत फूट पडली. २०२४ च्या निवडणुकीत वंचिततर्फे आपला स्वतंत्र उमेदवार घोषित करण्यात आला. अफसर खान यांना उमेदवारी दिल्यानंतर, अर्ज सादर करताना त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतंत्र लढण्याची घोषणा अफसर खान यांनी केली होती. त्यांनी तसा अर्ज देखील सादर केला; मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही मिनिटात त्यांचा एबी फॉर्म जोडण्यात आला. त्यामुळे ते अधिकृत उमेदवार झाले. प्रकाश आंबेडकर निवडणुकीत व्यस्त असल्याने एबी फॉर्म उशिरा आला, असं स्पष्टीकरण अफसर खान यांनी दिलं.
आम्ही पाठिंबा मागितला नाही : एम.आय.एम. पक्षाने बिनविरोध आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित निवडणूक न लढवता एम.आय.एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांना पाठिंबा देईल असं बोललं जात होतं; मात्र ऐनवेळी एबी फॉर्म आल्याने आता वंचितचा स्वतंत्र उमेदवार असणार आहे. आम्ही कोणालाही पाठिंबा मागितला नव्हता; परंतु आमच्या पक्षाची मतं मिळवण्यासाठी त्यांनी तो पाठिंबा जाहीर केला. प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप पक्षाला पाठिंबा द्यायचा हे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे फक्त मतांसाठी पाठिंबा दिला, अशी टीका अफसर खान यांनी केली. तर शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म दिल्याचं वंचित पक्षानं सांगितलं नाही, त्यांच्या पक्षातर्फे एक वेगळी खेळी असू शकते, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
हेही वाचा:
- "स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो..."; विनायक राऊतांची नारायण राणेंवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024
- भाजपाकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, विद्यमान खासदाराचा पत्ता कट; निकम म्हणाले... - Ujjwal Nikam Lok Sabha Candidate
- आधी बारामतीचा विकास केला, मग मतं मागायला आलो, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला - Ajit Pawar taunted Supriya Sule