ETV Bharat / state

धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी 'कासाकुटी'चा वापर; मेळघाटातील आदिवासींनी जपली जुनी परंपरा - Kasakuti Use Melghat Tribals

Kasakuti Use Melghat Tribals : मेळघाटात आजही जुन्या परंपराचा वापर होताना दिसून येतोय. यातील एका जुन्या परंपरामुळं आदिवासींना आपलं वर्षभराचं धान्य सुरक्षित ठेवता येतं. त्यासाठी आदिवासी बाधंव विशेष 'कासाकुटी'चा वापर करतात. या कासाकुटीला मराठीत 'कोठी' असं म्हणातात. यामुळं धान्याला किडे, कृमी, मुंग्यां लागत नाहीत. त्यामुळं धान्य सुरक्षित राहतं. वाचा संपूर्ण बातमी....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 7:45 PM IST

Kaskuti
धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलेली 'कासाकुटी' (ETV Bharat Reporter)

अमरावती Kasakuti Use Melghat Tribals : गहू, तांदूळ, ज्वारी वर्षभर सुरक्षित राहावं, यासाठी घरात विशेष अशी कासाकुटी तयार करून त्यामध्ये धान्य साठवलं जातं. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या अनेक गावांमध्ये अशी कासाकुटीची व्यवस्था आहे. 'ईटीव्ही भारत'नं चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या भवई या दुर्गम भागात वसलेल्या गावात रामाची जामुनकर यांच्याकडं असणाऱ्या या 'कासाकुटी'संदर्भात महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मेळघाटातील आदिवासींची 'कासाकुटी'ची जुनी परंपरा (ETV Bharat Reporter)

'अशी' आहे कासाकुटी : कासाकुटी हा कोरकू शब्द असून मराठी भाषेत मातीची कोठी असा अर्थ होतो. शेण, माती एकत्र कालवून बांबूंच्या कमच्याचा वापर करून चार ते पाच फुटांची ही कासाकुटी तयार केली जाते. सहा ते सात पोते धान्य मावेल इतकी मोठी ही कासाकुटी असते. या कासाकुटीमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ हे धान्य भरून ठेवलं जातं. या कासाकुटीमध्ये धान्य भरल्यावर कासाकुटीच्या वरच्या बाजूनं मोठे झाकण पुन्हा एकदा शेणामातीनं सारवून लावलं जातं. शेणामातीच्या या कासाकुटीमध्ये कीडे, मुंग्या जात नसल्यामुळं त्यामध्ये ठेवलेलं धान्य खराब होत नसून ते वर्षभरापेक्षाही जास्त काळापर्यंत अगदी सुरक्षित राहत असल्याची माहिती लता तोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. "भवई माझं माहेर असून आमच्या घरात आईनं 30-40 वर्षांपूर्वी ही कासाकुटी बनवली. या कासाकुटीचा आतला भाग दरवर्षी त्यामधलं धान्य काढल्यावर शेण, मातीनं सारवला जातो. यासह वर्षभरात अनेकदा ही कासाकुटी बाहेरून देखील शेणानं सारवली जाते," असं देखील लता तोटे यांनी सांगितलं.

पेरणीसाठी वापरतात धान्य : "शेतात पीक झाल्यावर धान्य बाजारात विकलं जातं. त्यानंतर घरात लहान मोठ्या कासाकुटींमध्ये दहा ते बारा पोती धान्य साठवून ठेवलं जातं. एखाद्या महिन्यात रेशनचं धान्य मिळालं नाही, किंवा धान्याची कमतरता भासली तर या कासाकुटीमधील धान्य वापरलं जातं. घरात लग्न, विविध कार्यक्रमावेळी देखील हे धान्य कामी येतं. कासाकुटीमध्ये ठेवलेलं धान्य हे मुख्यतः शेतात पेरणीसाठी प्रामुख्यानं वापरलं जातं. मृग नक्षत्र लागताच शेतात पेरणीची कामं सुरू होतात. त्यावेळी या कासाकुटीमधील धान्य काढून पेरणीसाठी वापरलं जातं," अशी माहिती सुजाता जामुनकर यांनी दिली.

पावसाळ्यात धान्याचा उपयोग : मेळघाटातील आदिवासी बांधव हे पावसाळ्यात धान्याचा वापर अतिशय कमी प्रमाणात करतात. पावसाळ्यात शक्यतो कोदो, कुटकी, ज्वारी, मकाच्या पिठाच्या मिश्रणापासून तयार करण्यात आलेले पेय ते पितात. या पेयाला 'पेज' असं म्हणतात. पावसाळ्यात तब्येतीची काळजी म्हणून मेळघाटातील आदिवासी बांधव हे उपाशीच राहतात. भूक लागली तर केवळ पेज ग्रहण करतात. पावसाळ्यात कासाकुटी रिकामी करून तिला शेणामातीनं सारवून ठेवली जाते. शेतात पीक आल्यावर पुन्हा एकदा ही कासाकुटी धान्यानं भरून ठेवली जाते.

कासाकुटी जतन करण्याचा प्रयत्न : पूर्वी मेळघाटातील प्रत्येक गावातील घरांमध्ये कासाकुटी असायची. आता घरांमधल्या कासाकुटीचं प्रमाण कमी झालं आहे. आदिवासींची नवी पिढी रोजगारासाठी जंगलाबाहेर पडत आहे. त्यामुळं अनेक गावांमध्ये परंपरागत जुन्या घरांची रचना देखील बदलत असल्यामुळं घरामधली अशी महत्त्वाची कासाकुटी आता घरातून हद्दपार व्हायला लागलीय. काही कुटुंबियांकडून कासाकुटी जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.