ETV Bharat / state

दिल्लीत UPSCची तयारी करणार्‍या मराठी युवतीची आत्महत्या; का संपवलं जीवन? - UPSC Student Suicide

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 7:33 AM IST

Updated : Aug 4, 2024, 8:29 AM IST

UPSC Student Suicide : दिल्लीत स्पर्धा परीक्षेची (UPSC) तयारी करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय युवतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. अंजली गोपनारायण (Anjali Gopnarayan) असं या युवतीचं नाव असून, ती मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट लिहिली होती.

Akola Suicide News
अंजली गोपनारायण (ETV BHARAT Reporter)

अकोला UPSC Student Suicide : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरणामुळं केंद्रीय नागरी लोकसेवा परीक्षेबाबत चर्चा सुरू आहे. तर अकोल्यातील एका यूपीएससीची (UPSC) तयारी करणार्‍या मराठी युवतीनं दिल्लीत आत्महत्या (Suicide News) केल्याची घटना 21 जुलै रोजी घडली. अंजली अनिल गोपणारायन (Anjali Gopnarayan) असं मृत युवतीचं नाव आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्व परीक्षेत आलेलं अपयश, दिल्लीतील घरभाडे वाढले आणि शिष्यवृत्ती संपल्यानं तिला मानसिक तणाव आला होता. तिनं दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगरातील राहत्या खोलीत आत्महत्या केली. ती दिल्लीत यूपीएससीची तयारी करत होती. तर आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यातून हे कारण समोर आलंय. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

बार्टीची मिळाली होती शिष्यवृत्ती : अंजली ही अकोल्यातील गंगानगर परिसरातील रहिवासी आहे. तिचे वडील अनिल गोपनारायण हे पोलीस मुख्यालयात एएसआय आहेत. तिनं बीएससी कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी दिल्लीला यूपीएससीचे क्लासेस करण्यासाठी गेली होती. सुरुवातीला एक वर्ष करोल बाग परिसरात ती राहिली. त्यानंतर गत एक वर्षांपासून ती राजेंद्र नगरमध्ये राहत होती. विशेष म्हणजे अंजलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारेच ती स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीला गेली होती.

अंजली होती तणावात : यूपीएससीची पूर्व परीक्षा 16 जून रोजी पार पडली. या परीक्षेत अंजलीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानं ती नाराज होती. त्यात तिच्या घरमालकांनीही राहत्या घराचं भाडं अडीच हजार रुपयांनी वाढवून 18 हजार रुपये केलं होतं. घर भाडे वाढल्यानं अंजली काहीशी तणावात होती. त्यात शिष्यवृत्तीही संपल्यानं तिच्या तणावात आणखीन भर पडली. हा तणाव तिला सहन झाला नाही आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्यापूर्वी अंजलीने सुसाईड नोट लिहिली होती. ज्यात तिने मानसिक तणावासह एका अनोळखी शहरात राहत असताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याचाही उल्लेख केला होता.

घर भाडेवाढीबाबत अंजलीनं आईला फोनवर सांगितलं होतं. नवीन घराच्या शोधात असल्याचंही तिनं सांगितलं होतं. आम्ही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. अंजलीच्या आईला तर मोठा धक्का बसला आहे. ओल्ड राजेंद्र नगरमध्ये पर राज्यातून विद्यार्थी शिकायला येतात. मात्र, तिथे शिक्षणाचे बाजारीकरण झालंय. त्याची झळ विद्यार्थ्यांना सोसावी लागते. - अनिल गोपनारायण, अंजलीचे वडील

काय आहे सुसाईड नोटमध्ये : तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, "मी खूप प्रयत्न केला. पण या नैराश्यातून बाहेर येण्याऐवजी ते आणखीन भयंकर होत चाललंय. मी डॉक्टरकडेही गेली होते. पण माझे मानसिक आरोग्य सुधारत नाही. पीजी आणि वस्तीगृहाचं भाडं कमी व्हायला हवं. ही लोकं विद्यार्थ्यांचे पैसे लुटत आहेत आणि प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नाही. हे सगळं आता सहनशीलतेच्या पलीकडं गेलं आणि आता बस झालं." अंजलीने आपल्या मृत्यूपश्चात अवयव दान करण्यात यावं, अशी विनंती सुसाईड नोटमधून कुटुंबीयांकडं केली.

हेही वाचा -

  1. गोरेगावात पती पत्नीचा आढळला मृतदेह; पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - Goregaon Couple Found Dead
  2. एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना; डॉक्टरची दवाखान्यात आत्महत्या तर.. तरूणीचा पाय घसरून मृत्यू - Satara Suicide News
  3. भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डनं केली आत्महत्या... - Buldhana Suicide News

Last Updated : Aug 4, 2024, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.