ETV Bharat / state

अवकाळी पाऊस, धुळीच्या वादळानं 'मायानगरी' आणि ठाण्यात हाहाकार, भर दुपारी दाटला अंधार; नागरिकांची तारांबळ - Rain in Mumbai - RAIN IN MUMBAI

Unseasonal Rain : मुंबई उपनगर तसंच ठाण्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं दुपारच्या सुमारास सोसाट्यच्या वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली.

अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 6:51 PM IST

अवकाळी पाऊस (ETV Bharat Reporter)

ठाणे/ मुंबई Unseasonal Rain : ठाण्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं दुपारच्या सुमारास सोसाट्यच्या वाऱ्यासह हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं हवामानात गारवा वाढलाय. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांसह वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडालीय. तर ग्रामीण भागात भाजीपाला लागवड केलेल्या शेतीवर या अवकाळी पावसासह गारांच्या पावसामुळं परिमाण झाल्याचं सांगण्यात येतंय. यामुळं आधीच तडपत्या उन्हामुळं हैराण झालेल्या नागरिकांमध्ये अवकाळी पावसानं साथरोगांची भर पडणार आहे.

मुंबई उपनगरपरिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस : मुंबईतील पश्चिम उपनगरासह दक्षिण आणि उत्तर मुंबईत धुळीचे प्रचंड लोट हवेत मिसळल्यानं वादळजन्य परिस्थिती निर्माण झालीय. आज दुपारी चार वाजल्यापासून मुंबईत काळोख दाटला असून, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात पावसाचा वर्षाव झालाय. मुंबईतील वांद्रे, लोअर परेल, माहीम, दादर, करी रोडसह अन्य ठिकाणी धुळीचं वादळ निर्माण झाल्यानं नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या डोळ्यात धूळ गेली आहे. यामुळं काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण : जोरदार विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसानं सोमवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर , अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण ग्रामीण, मुरबाड आणि शहापूरसह भिवंडीच्या ग्रामीण भागात हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं वातावरण थोडं आल्हाददायक होऊन गारवा पसरला होता.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम : विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारामध्ये रंगत आली असून, आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा महविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबीवलीच्या भागशाळा मैदानात आयोजित केलीय. मात्र, अवकाळी पावसानं या सभेवर परिणाम होण्याची भीती ठाकरे गटाकडून व्यक्त केली जातेय. तसंच जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिक अवकाळी पावसाचा जोर असल्यानं सर्वच उमेदवारांच्या प्रचार रॅलीत दाणदाण उडाल्याचं पाहयला मिळतंय.

विविध आजारांनी अवकाळी पावसामुळं निमंत्रण : अवकाळी पाऊस पडतांना वीजा देखील चमकत होत्या. या अवकाळी पाऊस असल्यानं ऐन उन्हाळ्यात गारठा वाढण्याची भीती आता नागरिक व्यक्त करत करण्यात आली असून विविध आजारांनी हा अवकाळी पाऊस निमंत्रण देणार असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे गरम वातावरण असताना अचानक पावसानं हजेरी लावल्यानं त्यात सोसाट्याचा वारा असल्यानं थंडगार वातावरणामुळं सर्दी खोकला असलेल्या नागरिकांना या पावसामुळं अधिकच त्रास सोसावा लागणार आहे. त्यात लहान मुलांनाही सर्दी व खोकलाची साथ आल्याचं दिसून येत, असल्यानं खाजगी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढलीय. तर पावसामुळं काही भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. सायंकाळी सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळं ठिकाणी सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलंय.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.