ETV Bharat / state

घरी प्रसूती करण्याचा अट्टाहास अविवाहित तरुणीच्या जीवावर बेतला; बाथरूममध्ये झाला मृत्यू - Navi Mumbai Crime - NAVI MUMBAI CRIME

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. अविवाहित असताना गरोदर असल्याची बाब लपवणं एका 18 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतलं (Pregnant Young lady Died) आहे. या तरुणीचा प्रसुतीदरम्यान बाथरूममध्ये मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी तिच्या नवजात बाळाचा देखील मृत्यू झाला.

Navi Mumbai Crime
प्रसूतीदरम्यान अविवाहित तरुणीचा मृत्यू (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 10:08 PM IST

नवी मुंबई Navi Mumbai Crime : कोणालाही कळू न देता घरीच प्रसुती करण्याचा अट्टाहास एका तरुणीच्या जीवावर बेतला. 18 वर्षीय अविवाहित तरुणीचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात घडली. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या नवजात बाळाचा देखील मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण? : संबंधित तरुणी ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आपल्या आई आणि भावंडासोबत राहत होती. मे महिन्यात शाळेला सुट्ट्या असल्यानं संबंधित तरुणी तिचे वडील राहत असलेल्या वाशीतील जुहुगाव येथे आई आणि दोन भावंडांसह राहण्यास आली होती. भावंडांची शाळा सुरू झाल्यानं जून महिन्यात मृत तरुणीची आई, लहान भावंडांना घेऊन श्रीवर्धन येथील गावी गेल्या होत्या. मात्र, मृत तरूणी आईसोबत गावी न जाता वडील राहत असलेल्या जुहू गावातील घरी राहत होती. गुरुवारी सकाळी संबंधित तरुणीचे वडील कामावर निघून गेले. घरी मुलगी एकटी असल्यानं वडील नेहमी फोनवरून मुलीची चौकशी करत असायचे. नेहमीप्रमाणे तरुणीच्या वडिलांनी दुपारी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा तरुणीला फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संध्याकाळी देखील तरुणीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यानं वडिलांनी शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं.

बाथरूममध्ये झाली प्रसूती : मुलगी फोन उचलत नसल्यानं वडिलांनी शेजाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितलं. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून तिला हाका मारल्या, अनेकवेळा हाका मारूनही तरूणीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं शेजाऱ्यांनी खिडकीच्या माध्यमातून दरवाजाची कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. घरातील दृश्य पाहून शेजारीही हादरुन गेले. बाथरूममध्ये संबंधित तरुणीची प्रसूती झाली होती आणि तरूणी बेशुद्ध पडली होती. तिचे नवजात बाळ तिच्या दोन्ही पायामध्ये पडले होते. बाळ जिवंत असल्यामुळं शेजाऱ्यांनी या तरुणीला आणि तिच्या बाळाला उपचाराकरिता वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.

आईचा मृत्यू झाल्यानंतर बाळाचाही मृत्यू : संबंधित तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याअगोदरच तिचा गुरुवारी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. मात्र, तिचे बाळ जिवंत होते. त्यामुळं त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी तरुणीच्या नवजात बाळाचा देखील मृत्यू झाला आहे.

तरूणीवर लैंगिक अत्याचार? : तरुणी लैंगिक अत्याचार झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती. ज्या व्यक्तीने तरुणीचे लैगिंक शोषण केलं, त्याचा शोध घेऊन बलात्कार तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वाशी पोलिसांनी सुरू केली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पीएसआय शेडगे अधिक तपास करत आहेत. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा श्रीवर्धन येथे घडला असल्यानं, पुढील तपासासाठी तिथे वर्ग करण्यात येईल असे वाशी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा -

  1. सिझेरियन ऑपरेशन करताना पोटात विसरला कापूस, महिलेचा मृत्यू
  2. वैद्यकीय चमत्कार! पहिलं बाळ गर्भात दगावल्यानंतर दुसऱ्या बाळाची १२५ दिवसांनी प्रसूती
  3. Nashik News : 'त्या' गर्भवती महिलेने वैद्याकडून घेतली होती औषधे, प्रसुती वेदनेमुळे मृत्यू नाही-जिल्हाधिकारी जलज शर्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.