पुणे BJP convention in Pune : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन रविवारी (21 जुलै) बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बालेवाडी परिसरात एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन : राज्यभरातून 5 हजार 300 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळं त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल : या बैठकीत अमित शाह मार्गदर्शन करणार असून सेनापती बापट रोडवरील एका स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी बालेवाडी परिसरात एक हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या बैठकीत ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याने रविवारी बालेवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाआघाडीला यश मिळालं नाही. दरम्यान, या अपयशाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय मागं घेतला. भाजपानं आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या अधिवेशनात राज्यातील लोकसभेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाचं चिंतन होणार आहे. सुमारे पाच हजार पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मंडळ प्रमुखांपासून ते राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांपर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे.
हे वाचलंत का :
- उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार 'गिफ्ट'; अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यात उपक्रम - Uddhav Thackeray Birthday
- "सुषमा आक्कांना हे कसं माहीत असणार?"; अंधारेंच्या 'त्या' टीकेला चित्रा वाघांचं प्रत्युत्तर - Chitra Wagh on Sushma Andhare
- दादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा; अजित पवार म्हणाले "मी माझ्या पैश्याचं घालतो..." - Ajit Pawar Pune Visit