ETV Bharat / state

अर्थसंकल्प सादर होताच शेयर बाजार ढासळला; काय आहेत नेमकी कारणं? - Budget Impact on Share Market - BUDGET IMPACT ON SHARE MARKET

Budget Impact on Share Market : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत 2024 चा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) केला. तर गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेनं जाणाऱया शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. अर्थसंकल्प सादर होताच शेयर बाजार का घसरला? जाणून घ्या कारणं....

Stock Market Falls
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि शेअर बाजार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 3:47 PM IST

Updated : Jul 23, 2024, 4:53 PM IST

मुंबई Budget Impact on Share Market : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर (Union Budget 2024) करण्यात आला. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काही मिळाले नसले तरी, बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, अशी टीका विरोधक करत आहेत. तसेच दुसरीकडं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारानं उसळी घेतली होती. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात कमालीची घसरण झालेली दिसून आली.

काय कारणं असू शकतात? : मंगळवारी सकाळी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी दिसून आली. यावेळी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी राहिल असं बोललं जात होतं. मात्र, अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली आहे. दरम्यान, शेअर बाजार जवळपास 1200 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये 241 अंकांची घसरण झालेली आहे. दुसरीकडं लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये मोठी वाढ झाली आहे. शॉर्ट टर्म पंधराचा वीस झाला आणि लाँग टर्म 10 चा 12.30 झाला. याचा परिणाम बाजारात दिसून येत आहे, असं शेअर बाजार अभ्यासक निखिल सोमण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतना म्हटलं आहे.

बाजारात हाहाकार उडाला : वार्षिक उत्पनातील कर प्रणालीत मोठे बदल करण्यात आल्यामुळं बाजारात हाहाकार उडाला. या कारणामुळं शेअर बाजाराची घसरण झाली असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. या बाजारातील घसरगुंडीमुळं गुंतवणूकदारांचा भ्रम निराश झाला.

नवीन करप्रणाली कशी आहे? -
उत्पन्न कर
3 ते 7 लाख - 5%
7 ते 10 लाख - 10%
10 ते 12 लाख - 15%
12 ते 15 लाख - 20%
15 लाख - 30%

हेही वाचा -

  1. कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केली थेट लाभ हस्तांतरण योजना, EPFO साठी 3000 कोटींची घोषणा - Union Budget 2024
  2. गृहिणींचं बजेट कोलमडलं; चिकनपेक्षा शेवगा महाग, इतर भाज्यांचे दरही शंभरी पार - Vegetable Rates Hike
  3. बजेट २०२४ - अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर विशेष भर
Last Updated : Jul 23, 2024, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.