ETV Bharat / state

अंडरवल्ड डॉन दाऊद, छोटा शकील ते अँटिलिया; नेहमीच वादग्रस्त राहिली सचिन वाजे यांची कारकीर्द - Sachin Vaze Controversial - SACHIN VAZE CONTROVERSIAL

Sachin Vaze Controversy: मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सचिन वाजे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वादात सचिन वाजे यांनी उडी घेतली. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sachin Vaze Controversial
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 5:24 PM IST

मुंबई Sachin Vaze Controversial : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आतापर्यंत त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे; परंतु मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाजे यांनी उडी घेतल्यानं आता हे प्रकरण आणखीनच तापलं आहे. त्यामुळे वाजे यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सचिन वाजे यांची कारकीर्द वादग्रस्त : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात सचिन वाजे यांचं नाव आलं. ते 1990 मध्ये मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीमुळे थोड्या अवधीतच ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून चर्चेत आले. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मुन्ना नेपाली अशा अनेक गँगस्टरच्या गँगमधील सदस्यांचा एन्काऊंटर केला आहे. 2003 मध्ये ख्वाजा युनूस नावाच्या घाटकोपर ब्लास्ट प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणावरून त्यांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आलं. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

प्रदीप शर्माचे शिष्य आहेत सचिन वाजे : मुंबईतील सुप्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे सचिन वाजे यांचे गुरू मानले जातात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सचिन वाजेनं 2007 मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर तब्बल 13 वर्ष शिवसेनेमध्ये काढल्यानंतर 2020 मध्ये ते पुन्हा एकदा पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सचिन वाजे यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता पथकाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. तसंच मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर कारमध्ये स्फोटकं सापडल्यानंतर हे प्रकरण सचिन वाजे यांच्याकडं देण्यात आलं; परंतु त्यानंतर याबाबत अनेक आरोप झाले. त्यामुळे त्यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये वाजेविषयी आक्षेप घेतला.

'एसआयटी'मार्फत करा चौकशी : सचिन वाजे यांनी आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकीकडं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब त्यासोबत अजित पवार यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकला, असा आरोप सातत्यानं अनिल देशमुख करत आहेत. त्यातच सचिन वाजे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, याचे पुरावे सीबीआयकडं असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणामध्ये त्यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचासुद्धा उल्लेख केला. आता या प्रकरणावरून भाजपा नेते आक्रमक झाले असून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची नवीन चाल : दुसरीकडं या संपूर्ण प्रकरणावर बोलताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख म्हणाले की, त्यांनी चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल असून सचिन वाजेची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असं खुद्द उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. असं असताना अशा व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, असं देशमुख म्हणाले. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये आता सचिन वाजे यांनी उडी घेतल्यानं हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.

हेही वाचा :

  1. सचिन वाजेंच्या आरोपांनी भाजपाच्या हातात आयतं कोलीत; अनिल देशमुख खंडणी प्रकरणावरुन पुन्हा उडणार 'भडका' - Sachin Vaze vs Anil Deshmukh
  2. मला सोडा, सचिन वाजेची याचना; सीबीआय, तळोजा तुरुंग प्रशासनाला उच्च न्यायालयाची नोटीस - Sachin Vaze Petition
  3. ख्वाजा युनूस प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवा, सचिन वाजेचा न्यायालयात अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.