ETV Bharat / state

"बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी..."; उद्धव ठाकरेंचा काय आहे आजचा प्लॅन? - Maharashtra Band - MAHARASHTRA BAND

Uddhav Thackeray : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपलीभूमिका स्पष्ट केली.

Uddhav Thackeray On Maharashtra Band
उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 9:20 PM IST

Updated : Aug 24, 2024, 6:58 AM IST

मुंबई Uddhav Thackeray On Maharashtra Band : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (24 ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचा उच्च न्यायालयानं निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी न्यायालयाचा आदर करत बंद मागे घ्यावा, असं आवाहन केलं. यानंतर शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, उद्याचा बंद तूर्तास मागे मात्र राज्यभर गाव-खेड्यात, चौका चौकात तोंडाला काळी फीती बांधून बदलापूर घटनेच्या निषेध करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोर्टाचा आदर पण निर्णय मान्य नाही : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले "न्यायालयानं तत्परतेनं या बंदला मनाई केली आहे. न्यायालय बंदबाबत जितक्या तत्परतेनं निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेनं गुन्हेगारांना शिक्षा द्यावी. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. परंतु न्यायालयाचा आदर आम्हाला ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जावू शकतो. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही वेळ नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार, अपील होणार या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार आहे. शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही बंद जरुर मागे घेत आहोत." राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत," असं सांगतं उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?"लोकशाही मानणाऱ्या या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट शिल्लक आहे की नाही? लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का? मी दुपारच्या माझ्या आवाहनात जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. बंद दरम्यान दगडफेक करा, असं कुठंही सांगितलं नव्हतं. जी गोष्ट घडली आहे, त्यामुळे प्रत्येक घरात चिंता निर्माण झालीय. प्रत्येकाला आपल्या बहिणीची, मुलीची, आईची काळजी असली पाहिजे. त्यांचं रक्षण करणारं कोण आहे का? हा प्रश्न आज लोकांच्या मनात निर्माण झालाय. त्यासाठी उद्याचा बंद होता." असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेचा आवाज उठवणारच : "उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी, आंदोलन थांबणार नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवणारच आहोत. कारण लोकशाहीत संप हा जनतेचा हक्क आहे. लोकशाहीच्या घटनेनुसार हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. उद्या मी स्वतः अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळी फिती लावून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध करणार आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

  1. "आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रस नाही", मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य - Sharad Pawar
  2. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, बंदमध्ये पोलिसांनी आडकाठी आणू नये - उद्धव ठाकरे - Maharashtra Band
  3. महाराष्ट्र बंद बेकायदा असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन - Bombay high court News

Last Updated : Aug 24, 2024, 6:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.