ETV Bharat / state

नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024

Uddhav Thackeray in Amravati : अमरावती मतदारसंघातील प्रत्येक कट्टर शिवसैनिक हा कधीही गद्दारांना साथ देणार नाही आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नवनीत राणा यांनाच थेट इशारा दिलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. सातत्यानं झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची हीच वेळ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितलं.

Uddhav Thackeray In Amravati
उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 4:13 PM IST

Updated : Apr 22, 2024, 4:38 PM IST

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारसभेत बोलताना

अमरावती Uddhav Thackeray In Amravati : आज आम्ही सगळे अमरावतीत थापाड्यांची खोटारड्यांची लंका जाण्यासाठी एकत्रित आलो आहोत. आजवर यांची खूप थेरं पाहिलीत. हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे मी अभिमानाने सांगतो. पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला असताना यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांचा बंदोबस्त आम्हीच करतो असे मला सांगितले. 80 कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन दिलं अशी भाषा सध्या जिकडे-तिकडे केली जात आहे. आपल्या देशातील नागरिकांना फुकटच्या रेशनची गरज नाही तर रोजगाराची गरज आहे. रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा जिकडे-तिकडे मोदी सरकार मोदी सरकार अशा घोषणा देतात. स्वतः नरेंद्र मोदी हे देखील मोदी सरकार असा उल्लेख करतात. केवळ देशाला लुटणारे हे मोदी सरकार आम्हाला नको तर आम्हाला आमचे भारत सरकार हवे असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हुकूमशाहीला गाडून टाका : सध्या देशात हुकूमशाही सारखे वातावरण आहे. आमच्या महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पळविण्यात आले आहे. अमरावतीच्या खासदारांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद पाडून गुजरातमध्ये नेले जात असल्या संदर्भात कधीही या सरकारला प्रश्न विचारला नाही. या देशात एका धर्मात प्रचंड मुलं जन्माला येत आहेत आणि आपल्या धर्मात मूल जन्माला येण्याचे प्रमाण कमी झाले, असे नरेंद्र मोदी म्हणतात. आता कुठे किती मुलं जन्माला येत आहेत आणि कुठे येत नाहीत हे नरेंद्र मोदी यांनाच चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. जाती धर्मात तेढ निर्माण करून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा यांचा डाव आहे. त्यांना या देशात हुकूमशाही हवी असून आमच्या कट्टर शिवसैनिकांनी त्यांची हुकूमशाही गाडून टाकावी, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

काँग्रेसवर करतात देश लुटण्याचा आरोप : माझ्याकडे निवडणूक लढायला पैसे नाही असे म्हणत निर्मला सीतारामन या निवडणूक लढणार नाही असे जाहीर करून त्या गप्प बसल्या नाहीत तर आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार असं त्यांनी जाहीर केलं. गेल्या दोन-अडीच वर्षांत या लोकांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये खाल्लेत आणि काँग्रेसवर आरोप करतात की त्यांनी देश लुटला. आज काँग्रेसकडे त्यांच्या तुलनेत अतिशय कमी पैसे आहे आणि ते देखील यांनी फ्रीज करून टाकले आहे. आज काँग्रेसच्या तिजोरीत किती पैसे आहेत आणि भाजपाच्या तिजोरीत किती पैसे आहेत याचा खुलासा झाला तर देशाला नेमकं कोणी लुटलं हे स्पष्ट होईल, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी आयोजित महाविकास आघाडीच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, काँग्रेसच्या नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. आदित्य ठाकरे 'ईटीव्ही'शी संवाद साधणार अन् तेवढ्यात स्टेज कोसळलं; किरकोळ दुखापत - aaditya thackeray stage collapsed
  2. उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला; यवतमाळ दौऱ्यावर घडली घटना, सामंत म्हणाले 'पोलीस करतील योग्य कारवाई' - uday samant
  3. उद्धव ठाकरेंची सभा संपताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की; काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Clash between Congress Leaders

Last Updated : Apr 22, 2024, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.